कोयना धरण यंदा भरणार का?

कोयना धरण यंदा भरणार का?

कऱ्हाड - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा ओढ दिली आहे. त्यामुळे राहिलेल्या महिभराच्या काळात कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची काळजी धरण व्यवस्थापनाला लागली आहे. त्यासाठी उर्वरित महिनाभरात सरासरी ५०० मिलिमीटर पावसाची गरज आहे. 

कोयना धरणाच्या इतिहासात प्रथमच यंदा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धरणाचे दरवाजे उघडले. जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाने १२ जुलैपासून जोर धरला. त्या काळात सरासरीपेक्षा २७ टक्के पाऊस जास्त पडल्याची नोंद झाली. सरासरी ३२९० मिलिमीटर पाऊस झाला. त्यावेळी धरणातील पाण्याची उंची २१४४.८० होती, तर धरणाने ८३.१३ टीएमसी पाणीसाठ्याचा टप्पा २९ जुलैलाच गाठला. परिणामी एक ऑगस्टला निर्धारित ठेवली जाणारी जलपातळी गाठल्याने ३० जुलैलाच धरण व्यनस्थापनाने कोयनेचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले. तेथून व पायथा वीजगृहातून मिळून ११ हजार ७९२ क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. तीनच दिवसांत टप्प्याटप्प्याने दरवाजांची उंची कमी करून ते बंद करण्यात आले. 

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाच ऑगस्टनंतर पाऊस ओसरला. कोयनेच्या पाण्याची आजची उंची २१५१.११ फूट आहे. पाणीसाठा ९०.३५ टीएमसी आहे. जुलैला दरवर्षीच्या सरासरीपेक्षा २७ टक्के जादा पाऊस होवूनही ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात पावसाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पावसाची गरज आहे. त्याची चिंता कोयना धरण व्यवस्थापनास लागली आहे. कोयना धरण अजूनही १५ टीएमसी भरायचे आहे. त्यासाठी उर्वरित काळात किमान सरासरी किमान ५०० मिलिमीटर पाऊस झाला पाहिजे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आजअखेर चार हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा ओलांडला आहे. कोयना परिसरात आजअखेर तीन हजार ६१२ मिलिमीटर, नवजाला चार हजार १५२, तर महाबळेश्वरला तीन हजार ५०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

कोयना धरण मजबूत स्थितीत भरण्यासाठी उर्वरित काळात पूर्ण क्षमतेने पाऊस होण्याची गरज आहे. महिनाभरात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे.
- ज्ञानेश्वर बागडे,  कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com