कोपर्डे हवेली येथील यात्रा होणार प्लॅस्टीकमुक्त

जयंत पाटील 
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

दोन महिन्यापासून गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्याचा वापर होतो त्यामुळे होणारे प्रदूषण कागदी पिशव्या वापरून थांबवू शकतो म्हणून आम्ही पाच हजार कागदी पिशव्या बनवून यात्रेदिवशी विक्रेत्यांना मोफत वाटण्याचा निर्णय घेतला आहे. 

- संदिप चव्हाण,  युवा मंच सदस्य, कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड, जि  सातारा) 

कोपर्डे हवेली - येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची यात्रा परिसरातील सर्वात मोठी यात्रा आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी रथातून श्री सिध्दनाथ आणि माता जोगेश्वरीची गावातुन मिरवणुक काढली जाते. त्यावेळी गुलाल खोबर्यांची ऊधळण होते. त्यावेळी येथे विक्रीस येणारे गुलाल खोबरे कागदी पिशवीतून देण्यात येणार आहे. प्लॅस्टीक पर्यावरणाला हानीकारक आहे, ती बाब लक्षात घेवून येथील युवकांनी एकत्रीत येवून युवा मंचच्या मार्फत गुलाल खोबर विकमाऱ्यांना कागदी पीशव्यांचे मोफत वाटप वाटल्या जाणार आहे. युवकांनी तो निर्धा रॉकेला आहे. त्यामुळे येथील यात्रा प्लॅस्टीकमुक्त होणार आहे. 

सिध्दनाथ देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस गुरवार (ता. २) आहे. त्यासाठी येथील युवा मंचने पाच हजार पीशव्या बनवीन्याचे काम सुरू झाले आहे. यात्रे मध्ये विविध कारणासाठी प्लँस्टीक पीशव्यांचा वापर केला जातो. गुलाल खोबरे देण्यासाठी दुकानदार प्लँस्टीक पीशव्यांचाच वापर करत असतात तो होऊ नये यासाठी कोपर्डे गावातील युवा मंच पुढे सरसावला आहे या कागदी पीशव्या तयार करण्याचे काम गावातील बेरोजगार पाच मुलांना देण्यात आले आहे. दीड कीलो वजण बसेल अशा पीशव्या बनविण्याचे काम चालू आहे. त्यांना ग्रामस्थांची साथ लाभली आहे. कागदी पीशव्या यात्रेतील दुकानदारांना मोफत  पुरवण्यात येणार आहेत. प्लास्टिक पीशवी वापरणार नाही यासाठी गावातील दुर्गाऊत्सव मंडळांच्या आरती वेळी आरधी मंडाळाने शपथ घेण्याचा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी अनेक महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते. तसेच दुर्गा दौड सांगता कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानच्या धारकर्यानी प्लास्टिक पिशव्या वापरणार नाही अशी शपथ घेतली आहे. शासण तसेच सामाजिक संस्था यांच्या माध्यमातुन प्लँस्टीक मुक्ती करण्याचे काम सुरु असताना कामा निमीत्त बाहेर असणारा युवक वर्ग  युवा मंचाच्या माध्यमातून आपल्या गावासाठी ऊपक्रम राबवत आहेत. या ऊपक्रमाचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे. 

दोन महिन्यापासून गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्याचा वापर होतो त्यामुळे होणारे प्रदूषण कागदी पिशव्या वापरून थांबवू शकतो म्हणून आम्ही पाच हजार कागदी पिशव्या बनवून यात्रेदिवशी विक्रेत्यांना मोफत वाटण्याचा निर्णय घेतला आहे. 

- संदिप चव्हाण,  युवा मंच सदस्य, कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड, जि  सातारा) 

Web Title: karad news: plastic festival