शाळांतील झाडांची नोंदणी बंधनकारक! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

कऱ्हाड - दरवर्षी अनेक ठिकाणी खड्डे तेच आणि झाडे नवीन, अशी प्रचिती गेली अनेक वर्षे शासनाच्या विविध विभागांतून दिसून येते. त्यावर उपाय म्हणून आता शासनाने यावर्षी जिल्हा परिषद शाळांमध्ये झाडे लावण्यासांठी खोदलेले खड्डे आणि लावलेली झाडे यांची माहिती ऑनलाइन भरणे बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक शाळांपुढे यापूर्वी झाडे लावल्याने जागाच उपलब्ध नसल्याने झाडे लावायची कोठे, असा प्रश्‍न आ वासून उभा आहे.

पर्यावरणाचा बिघडलेला समतोल पुन्हा सावरण्यासाठी शासन दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करते. त्याअंतर्गत दरवर्षी लाखो रोपे लावलीही जातात. मात्र, त्याचे संगोपन होत नाही. त्यामुळे अनेक  रोपे वाया जातात, हे शासनानेच केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. त्याचबरोबर शासनाने ही रोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावीत यासाठी रोपवाटिकाही ग्रामपंचायत व खासगी व्यक्तींच्या माध्यमातून सुरू केल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले. मात्र, ती झाडे जगली की नाही, याची खातरजमा केली जात नाही. त्याचबरोबर अनेकदा मागील वर्षाच्या खड्डयातच नवीन झाडे लावली जातात, हेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यावर बंधन आणण्यासाठी शासनाने आता शाळांमध्ये होणाऱ्या वृक्षारोपणात पारदर्शकता आणण्यासाठी झाडांसाठी काढलेल्या खड्डयांपासून वृक्षारोपणाची माहिती ऑनलाइन भरण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षांत राबवण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या मोहिमेमुळे अनेक शाळांतही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. 

जागेचा सर्व्हे आवश्‍यक 
जिल्हा परिषद शाळांमध्ये यापूर्वी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शाळांतील वृक्षारोपणासाठीची जागाच संपल्याने नवीन वृक्षारोपण करायचे कोठे, हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी शाळांकडे जागा किती उपलब्ध आहे, याचा सर्व्हे करून त्यांना वृक्षारोपणाची माहिती ऑनलाइन भरणे बंधनकारक करणे गरजेचे आहे.

Web Title: karad news Registration of trees in schools is compulsory