वाळूउपशाच्या कारवाईत हवे सातत्य 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

कऱ्हाड - तालुक्‍यात महसूल प्रशासनाकडून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधातील कारवायांमुळे अवैध उपसा करणारे हवालदिल झाले आहेत. दरम्यान, या कारवाईतून अवैध उपसा 

सुरू असल्याचेही अधोरेखित झाले आहे. अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहिल्यास अवैध वाळूउपशावर जरब बसून, शासनाचा "महसूल'ही वाढण्यास मदत होईल. 

कऱ्हाड - तालुक्‍यात महसूल प्रशासनाकडून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधातील कारवायांमुळे अवैध उपसा करणारे हवालदिल झाले आहेत. दरम्यान, या कारवाईतून अवैध उपसा 

सुरू असल्याचेही अधोरेखित झाले आहे. अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहिल्यास अवैध वाळूउपशावर जरब बसून, शासनाचा "महसूल'ही वाढण्यास मदत होईल. 

कऱ्हाड तालुक्‍यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा केला जातो. या नदीतील वाळू ही स्वच्छ असल्याने तिला राज्यातून मोठी मागणी असते. या नदीतून उपसा करण्यात येणाऱ्या वाळूसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लिलाव काढण्यात येतात. त्यातून प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल दरवर्षी मिळतो. मात्र, गेल्या वर्षी नदी प्रदूषणाचा मुद्दा जोरात चर्चिला गेला. त्याचा विचार करून हरीत लवादाने पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करत नदीतून बोट लावून वाळूउपसा करण्यावर बंदी घातल्याने वाळूउपसा सध्या बंद आहे. परिणामी गेल्या वर्षापासून महसूल प्रशासनाने वाळूचे लिलावच काढलेले नाहीत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांची महसूल बुडाला आहे. त्यावर पर्याय म्हणून मध्यंतरी महसूल प्रशासनाने मातीमिश्रित वाळू काढण्यासाठी परवानगी दिली. मात्र, त्यालाही मोठा विरोध झाल्याने तेही बंद झाले आहे. मात्र, त्यामुळे सध्या बांधकामासाठी वाळूच उपलब्ध होत नाही. परिणामी चोरटा वाळूउपसा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. त्यामुळे वाळूचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कृष्णा-कोयना नदीतून सध्या चोरटा वाळूउपसा सुरू आहे. मध्यरात्रीनंतर नदीकाठी हा वाळूउपसा केला जात आहे. त्याचा विचार करून प्रांताधिकारी हिंमत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी मंडल अधिकारी व तलाठी यांची पथके तयार करून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत येरवळे, वारुंजी, केसे, कालगाव, प्रीतिसंगम घाट आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये दोषी आढळलेल्या सहा जणांवर थेट फौजदारी कारवाई करून संबंधिताचे साहित्य व वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर संबंधितांना दंडही ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे अवैध वाळूउपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, या कारवाईत सातत्य राहणे गरजेचे आहे. त्यामुळे अवैध वाळूउपशाला चाप बसेल. 

"कृष्णा'बरोबर "कोयना'ही टार्गेट  
कऱ्हाड तालुक्‍यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा केला जात होता. मात्र, अलीकडे वाळूउपशावर बंदी घातल्यामुळे कृष्णा नदीबरोबरच कोयना नदीही अवैध वाळूउपसा करणाऱ्यांनी टार्गेट करून वाळूउपसा सुरू केला आहे.

Web Title: karad news sand issue