कऱ्हाडमध्ये २५ पासून प्रीतिसंगम संगीत महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

कऱ्हाड - येथील कऱ्हाड जिमखानातर्फे ता. २५ व ता. २६ जानेवारीला प्रीतिसंगम संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव सुधीर एकांडे यांनी दिली. 

कऱ्हाड - येथील कऱ्हाड जिमखानातर्फे ता. २५ व ता. २६ जानेवारीला प्रीतिसंगम संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव सुधीर एकांडे यांनी दिली. 

एकांडे म्हणाले, ‘‘संस्थेने १८ वर्षांपूर्वी उस्ताद अमीर हुसेन खाँ साहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रीतिसंगम महोत्सवाचे आयोजन करण्यात सुरवात केली. हा उपक्रम संस्थेने सातत्याने सुरू ठेवला आहे. महोत्सवात पंडित जसराज, किशोरी आमोणकर, हरिप्रसाद चौरसिया, एन. राजम, अजय पोहनकर, अरविंद मुळगावकर, विश्वमोहन भट्ट, राजन व साजन मिश्रा, संगीतकार नौशाद, पार्श्वगायिका आशा भोसले, पूर्वायन चटर्जी, मालिनी राजूरकर, देवकी पंडित, आरती अंकलीकर, शर्वरी जमेनीस, तरुण भट्टाचार्य, प्रभाकर कारेकर, व्यंकटेश कुमार, जयतीर्थ मेहुंडी, हिमांशू नंदा, सावनी शेंडे अशा प्रतिभासंपन्न दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला आहे. महोत्सवात दररोज रात्री साडेआठ ते साडेबारा या वेळेत कऱ्हाड अर्बन बॅंकेच्या शताब्दी सभागृह कऱ्हाड येथे होणार आहे. महोत्सवाची सुरवात प्रसिद्ध गायक कैवल्यकुमार गुरव (धारवाड) यांच्या गायनाने होणार आहे. त्याचबरोबर यावर्षी कऱ्हाडची आलापिनी जोशी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. पंडिता किशोरी आमोणकर यांचे शिष्य यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन व एस. आकाश यांचे बासरी वादनाची मैफील रसिकांसाठी आयोजित केली आहे. महोत्सवाची सुरवात कैवल्यकुमार गुरव यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवात सुखद मुंडे- पखवाज वादन, हनुमंत फडतरे- तबला व सुरेश फडतरे- संवादिनी यांची साथसंगत लाभणार आहे. या वेळी कलाकारांचा गौरव संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. शहर व परिसरात नवोदित कलाकार व जाणकार रसिकांनी विनामूल्य सन्मानिकांसाठी महेंद्रकुमार शहा यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: karad news sangeet mahotsav