कऱ्हाडला गुन्ह्यांचा चढता आलेख कायम

Karad-Crime
Karad-Crime

कऱ्हाड - तालुक्‍यातील ‘क्राईम रेट’ वाढताना दिसतो आहे. वर्षभरात घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची तुलना केल्यास हा ‘क्राईम रेट’ रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पोलिसांनी काही खास प्रयत्न मध्यंतरी केले. जनतेशी संपर्क वाढवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमही राबवले आहेत. गर्दी, मारामारी, घरफोड्या, बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांत गत वर्षापेक्षा तालुका आघाडीवर राहिला आहे. दारूबंदीसाठी पोलिस अग्रेसर राहिले. मात्र, जुगावरील कारवाईत तालुका पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते.

दरोड्यासह अनेक महत्त्वाचे गुन्हे पोलिसांच्या खात्यावर यशस्वी म्हणून नोंदवले असले तरी गुन्ह्याचा चढता आलेख मात्र कायम राहिला आहे. 

तालुका पोलिस ठाण्यात वर्षभरात अनेक महत्त्वाचे गुन्हे घडले आहेत. त्यात वडगाव हवेली येथील हवेत गोळीबार करून झालेला दरोडा, उंडाळे येथील युवकाचा मुंबई येथे झालेला खून, बनवडी येथील खून अशा अनेक महत्त्वाच्या घटनांच्या तपासात पोलिसांना यश आले आहे. अनेकदा अवघड गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांनी अन्य पोलिस ठाण्यांना सोबत घेऊन तपास केल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांना महत्त्वाच्या गुन्ह्यात यश आले असले तरी अनेक सार्वजनिक गुन्ह्यांत मात्र वाढ झाल्याचे दिसते. त्यात तालुक्‍यातील अनेक गावांत मारामारीचे गुन्हे झाले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवता न आल्याने यंदा किमान ६४ गुन्हे अतिरिक्त दाखल झाले आहेत. तांत्रिकतेच्या मुद्द्यावर काही गुन्हे दाखल असले तरी काही गुन्ह्यांमुळे त्या गावात जमावबंदी लागू झाल्याच्या घटना आहेत.

दरोड्याच्या गुन्ह्यांत यश आले असले तरी मागील वर्षापेक्षा दोन दरोडे अधिक पडल्याचे यंदा दिसले. चोरीचे नऊ जास्त गुन्हे यंदा दाखल झाले आहेत. त्यात दिवसा घरफोडी आटोक्‍यात आली असली तर रात्रीच्या घरफोड्या वाढल्या आहेत. त्यात ५० हजारांहून अधिक रक्कम लंपासचे गुन्हे अद्यापही तपासावर आहेत. जबरी चोरीतही वाढ झाली आहे. त्याचे दोन जास्त गुन्हे यंदा दाखल आहेत. सदोष मनुष्यवधाचा एक गुन्हाही दाखल आहे. 

तालुका पोलिसांकडे गतवर्षापेक्षा यंदा सुमारे २०० अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यात चोरीचे नऊ, आत्महत्येचे प्रयत्न सात, विनयभंगाचे नऊ, भाग पाचचे ४७, भाग सहाचे दोन व तर अन्य सुमारे ६८ गुन्हे दाखल आहेत.

दारूंबदीसाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केल्याने यंदा सुमारे १२८ लोकांवर त्यांनी कारवाई केलेली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ५९ हून जास्त गुन्हे पोलिसात दाखल आहेत. मात्र, पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करताना हात आखडता घेतल्याचे दिसते. मागील वर्षी ३२ जुगार अड्ड्यांवर कारवाई झाली होती. ती यंदा ३१ वरच थांबली आहे. भाग सहाच्या अन्य गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी केल्याने तेही सुमारे ३७ गुन्हे घटले आहेत. पोलिसांची सार्वजनिक मारामारीवर कारवाई ढिली असल्याने तालुक्‍यातील  ‘क्राईम रेट’ मात्र वाढताना दिसतो आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com