सुप्रिया सुळेंचा आज तरुणाईशी संवाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

कऱ्हाड - मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत जागर युवा संवाद कार्यक्रमाद्वारे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे उद्या (ता. 22) येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात तरुणाईशी संवाद साधणार आहेत. प्रतिष्ठानच्या येथील उपकेंद्राचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. 

येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयातील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होईल. स्त्री भृणहत्या, युवतींना होणारी छेडछाड व अत्याचार, हुंडाबळी, युवक- युवतींच्या आत्महत्या या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे या घटानांविरोधात युवक- युवतींच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी खासदार सुळे यांनी जागर युवा संवादचे आयोजन केले आहे.

Web Title: karad news supriya sule youth