कऱ्हाडमध्ये स्वाइन फ्लूने तीन रुग्णांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

कऱ्हाड - येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तीन रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयानेही त्याला दुजोरा दिला आहे. सध्या शहरातील खासगी रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात 19 संशयित रुग्ण दाखल असून, त्यातील तिघांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे आढळले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 

रुग्णांची लक्षणे बघून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात येत आहेत. येथील खासगी रुग्णालयात दाखल झालेले तालुक्‍यातील तीन रुग्ण दगावले आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयंत दाभोळे म्हणाले, ""थंडी, ताप, खोकला, सर्दीसारखी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी तातडीने तपासणी करावी. दोन दिवसांत ताप कमी आला नाही आणि अशक्तपणा वाढल्यास तातडीने डॉक्‍टरांच्या निदर्शनास आणून द्यावे. नागरिकांनी घाबरून न जाता साबणाने स्वच्छ हात धुवावेत, दररोज ताजे आणि सकस अन्न खावे, शिंकताना-खोकताना तोंडावर रुमाल धरावा, यासारख्या उपाययोजना कराव्यात.'' 

दरम्यान, तालुक्‍यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांनी दिली. 

Web Title: karad news swine flu

टॅग्स