अट्टल चोरट्याच्या फिरकीपुढे पोलिस हतबल!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

कऱ्हाड - नाव, पत्ताही बोगस... वय पन्नाशीतले... दिवसा घरफोडीत हातखंडा... पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी पोलिस ठाण्यात रेकॉर्ड... मात्र, पोलिस त्याच्या विरोधात एकही पुरावा शोधू शकले नाहीत. कऱ्हाड व सांगली अशा दोन ठिकाणी भरदिवसा चोरी करताना त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. तो दिवसा चोरी करण्यासाठी आल्याचे त्याच्या सायकलसह सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडे आहे. 

मात्र, त्याने चोरलेले दागिने नेमके कोठे ठेवलेत, याचा शोध पोलिसांना घेता आलेला नाही. कितीही विचारले तरी तो माहिती सांगत नाही. तो मूळचा सोलापूरचा असल्याचे सांगत असला तरी त्या पत्त्यावर दुसरीच व्यक्ती आहे. शेख बाबू शेख असे संबंधित संशयित त्याचे नाव सांगत आहे. त्याचे वय ५५ आहे. या अट्टल चोरट्याने माहिती सांगताना टाकलेल्या खोट्या माहितीच्या फिरकीपुढे पोलिस हतबल झाल्यासारखी स्थिती आहे. 

त्याचा पेहराव अत्यंत साधा आहे. चोरीची त्याची पद्धत अत्यंत साधी आहे. चोरीसाठी कॉम्प्लेक्‍स किंवा बंद घर तो हेरतो. त्याच घराच्या हालचाली टिपतो. सगळ्या हालचालींचा अभ्यास झाला की, तो बरोबर ‘टायमिंग’ गाठून चोरी करतो. तीही भरदिवसा. चोरी करण्यासाठी तो सायकलवरून येतो.

कऱ्हाड येथील आगाशिवनगरमध्ये एका कॉम्प्लेक्‍समध्ये तो मागील आठवड्यात नागरिकांना चोरी करताना रंगेहात सापडला. त्याची सायकलही पोलिसांनी जप्त केली. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातही तो दिसतो आहे. नागरिकांनी त्यास पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी गुन्ह्यात अटकही केली. त्याने सांगितलेले चार ते पाच पत्ते पोलिसांनी शोधून काढले. त्यावेळी पोलिसांना धक्का बसावी, अशी माहिती समोर आली. तो जे नाव व गाव सांगतो, त्या प्रत्येक गावात त्याच नावाची व त्याच पत्त्यावर राहणारी स्वतंत्र व्यक्ती आहे. त्यामुळे तो बोगस नाव सांगत असल्याची पोलिसांची खात्री झाली. म्हणून पोलिसांनी छायाचित्रासह त्याची माहिती राज्यातील अन्य जिल्ह्यात माहिती पाठवली. त्यावेळी आता हाती असलेल्या माहितीपेक्षाही अत्यंत धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली.

Web Title: karad news thief police