तातडीच्या सुविधा भाजी मंडईत आठ दिवसात देण्यात येतील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

भाजी मंडई परिसरात सुविधा व सोयी काय आहेत, तेथील नक्की काय समस्या आङेत. यासाठी आज नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी भाजपच्या नगरसेवकांसह भाजी मंडईत फिरून पहाणी केली. सुमारे तासभर त्यांनी भाजी मंडई परिसरात वेगवेगळ्या भागात भेट देवून त्या भागातील समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर,  नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार, सचिन जगताप, घनश्याम पेंढाकर, माजी उपाध्यक्ष फारूक पटवेकर यांच्यासह शहर अभियंता एम. एच. पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थीत होते

कऱ्हाड - तातडीच्या सुविधा भाजी मंडईत आठ दिवसात देण्यात येतील, त्यासाठी पाठपुरावा करून त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी आज येथील व्यापाऱ्यांना दिली. सुमारे तासभर भाजी मंजडई परिसरात नगराध्यक्षा सो. शिंदे यांनी नगरसेवक, पालिका अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली. 

भाजी मंडई परिसरात सुविधा व सोयी काय आहेत, तेथील नक्की काय समस्या आङेत. यासाठी आज नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी भाजपच्या नगरसेवकांसह भाजी मंडईत फिरून पहाणी केली. सुमारे तासभर त्यांनी भाजी मंडई परिसरात वेगवेगळ्या भागात भेट देवून त्या भागातील समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर,  नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार, सचिन जगताप, घनश्याम पेंढाकर, माजी उपाध्यक्ष फारूक पटवेकर यांच्यासह शहर अभियंता एम. एच. पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थीत होते.

भाजी मंडई परिसरात सुविधांचा अभाव आहे, त्याबाबत पालिका व नगराध्यक्षांकडे विविध तक्रारी दाखल आहे. त्याबाबत तेथील काही स्थानिक नगरसेवकांनीही त्यात लक्ष घालून त्या समस्या सोडवण्यासाटी प्रयत्न केला आहे. त्या भागात यापूर्वी तेथील नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने यांनी त्या भागात दिवाळीपूर्वी फिरून पहाणी केली होती. आज नगराध्यक्षा सो. शिंदे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी त्या भागात फिरून तेथील समस्या जाणून घेतल्या. दुपारी बाराच्या सुमारास नगराध्यक्षा सौ. शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक श्री. पावसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या भागात फिरून पहाणी केली. येथील जनता व्यासपीठापासून त्यांनी पहाणी सुरू केली. किरकोळ व्यापारी बसतात त्यासह मटण मार्केट, पुर्वीच्य़ा फीश मार्केटसह भाजी मंडईच्या नविन इमारतीचीही पहाणी केली. त्यावेळी त्यांनी भागातील व्यापारी व तेथील विक्रेत्यांशी त्यांनी चर्चा केली. सुविधा काय देता येईल याचीही अदिकाऱ्यांसमक्ष त्यांनी चर्चा केली. 

Web Title: karad news: vegetables