कऱ्हाडला पहिला ब्रेक टेस्ट ट्रॅक

हेमंत पवार
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

कऱ्हाड आरटीओ कार्यालयाने नैसर्गिक परिस्थितीचा वापर करून आत्याधुनिक ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार केला आहे. उच्च न्यायालय आणि परिवहन खात्याच्या आदेशनुसार हा ट्रॅक तयार करण्यात आला असून, यापुढे हा ट्रॅक सर्वच कार्यालयांना बंधनकारक आहे. त्याची कार्यवाही कऱ्हाड आरटीओ कार्यालयात सुरू झाली असून, आता सांगली व सातारा जिल्ह्यांतील वाहनेही पासिंगसाठी येथील ट्रॅकवर आणण्यात येत आहेत.
- अजित शिंदे, आरटीओ, कऱ्हाड

कऱ्हाड - येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने नैसर्गिक परिस्थितीचा वापर करून आत्याधुनिक ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार केला आहे. वाहनांच्या पासिंगसाठी उच्च न्यायालय आणि परिवहन खात्याने आता हा ट्रॅक बंधनकारक केला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील नैसर्गिक ट्रॅक असलेले कऱ्हाड हे एकमेव कार्यालय असून, त्याद्वारे आता वाहनधारकांची तपासणी सुरू झाली आहे. त्यामुळे कऱ्हाड आरटीओ कार्यालयाने याद्वारेही आपली वेगळी ओळख राज्याला करून दिली आहे. 

येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाल्यापासून सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. पहिल्या टप्यात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठीची ऑनलाइन पद्धत, त्यानंतर सर्व कारभार संगणकीकृत करण्यासह आत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून कारभार करणारे कार्यालय म्हणून कऱ्हाड कार्यालयाची ओळख येथे काम केलेल्या अधिकाऱ्यांनी निर्माण केली आहे. त्याचबरोबर येथील कार्यालयाने करातून महसूल जमा करण्यामध्येही दर वर्षी चढती कमान ठेवली आहे. त्यामुळे येथील कार्यालय हे राज्यासाठी नवनवीन उपक्रम राबणारे ‘आयडॉल‘ कार्यालय म्हणून नावारूपास आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता येथील कार्यालयात नैसर्गिक परिस्थितीचा वापर करून आत्याधुनिक ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील नैसर्गिक ट्रॅक असलेले कऱ्हाड हे एकमेव कार्यालय असून, त्याद्वारे आता वाहनांची तपासणी सुरू झाली आहे.

ही सर्व तपासणी संगणकीकृत असणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनाही आता या ट्रॅकवरच तपासणी झाल्याशिवाय अधिकृत तपासणी झाल्याचे पत्र मिळणार नाही. आत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून सुरू करण्यात आलेली ही यंत्रणा उच्च न्यायालय आणि परिवहन विभागाने सर्व कार्यालयांना आता बंधनकारक केली आहे. त्याद्वारेच आता परवाना देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे कऱ्हाड कार्यालयाने ही सोय करून आपली वेगळी ओळख राज्याला करून दिली आहे. 

कऱ्हाडला नैसर्गिक परिस्थितीचा वापर करून आत्याधुनिक ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील नैसर्गिक ट्रॅक असलेले कऱ्हाड हे एकमेव कार्यालय आहे. संबंधित ट्रॅक हा परवान्यासाठी परिवहन खात्याने बंधनकारक केला आहे. तो ट्रॅक अन्य जिल्ह्यात नाही. त्यामुळे आता सांगली आणि साताऱ्याच्या गाड्या कऱ्हाडला पासिंगसाठी आणण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

Web Title: karad news western maharashtra news break test track