MarathaKrantiMorcha कऱ्हाड पंचायत समितीत मराठा आरक्षणाचा ठराव

हेमंत पवार 
शुक्रवार, 27 जुलै 2018

कऱ्हाड : मराठा समाजाने आत्तापर्यंत राज्यात लाखोंचे मोर्चे शांततेने काढले. मात्र तरुणांची सहशीलता आता संपली आहे. त्याचा उद्रेक होऊ लागला आहे. दोन तरुणांचा त्यामध्ये मृत्युही झाला. आता आणखी संयम सुटण्याची वाट न बघता सरकारने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करुन मराठा समाजा आरक्षण द्यावे, असा ठराव माजी पंचायत समिती सभापती व विद्यमान सदस्य देवराज पाटील यांनी मांडला. त्याला सदस्य रमेश चव्हाण यांनी अनुमोदन दिले. सभापती इनामदार अध्यक्षस्थानी होत्या. 

मराठा समाजाच्या आरक्षणाच्याबाबत देवराज पाटील म्हणाले, मराठा समाजातील अनेक युवक आज बेकार आहेत. त्यांना नोकऱ्या नाहीत. सरकारकडूनही नोकऱ्या देण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे चांगली गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्याने त्यांना त्याचा लाभ होत नाही. परिणामी अनेक युवकांपुढे मोठे प्रश्न उभे आहेत. मराठा समाजातील अनेक कुटुंबे ही गरीब आहेत. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता त्यांना सिध्द करता यावी यासाठी मराठा समाजाला आघाडी सरकारने १६ टक्के आरक्षण दिले होते.

मात्र, ती बाब न्यायालयीन झाली. न्यायालयाने सरकारकडे शपथपत्राची मागणी केली होती. ते शपथपत्र द्यायला सरकारने 17 महिने लावले. त्यामुळे सरकारकडून चालढकलपणा सुरु आहे. सरकारने सध्या असलेल्या 52 टक्के आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असा ठराव मांडला.

Web Title: Karad Panchayat Committee on Maratha Reservation