डांबरीकरणानंतरही खड्ड्यांचे ग्रहण कायमच...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

कऱ्हाड - अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाला मुहूर्त मिळाला; पण कायम राहिले ते खड्ड्यांचे ग्रहण. पाणी, ड्रेनेजच्या कामासाठी नव्याने झालेल्या रस्त्यावर पाडले जाणारे खड्डे पुन्हा व्यवस्थित न बुजवल्याने नवीन रस्ता होऊनही त्यावर खड्डे दिसतातच. पालिकेच्या योग्य नियोजनाच्या अभावी खड्ड्यांची साडेसाती काही कऱ्हाडकरांचा पाठलाग सोडत नाही, हेच खरे... 

पालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामांना प्रारंभ झाला. घाईगडबडीने सुरू झालेल्या कामांमुळे नळ कनेक्‍शनसह ड्रेनेजच्या कामासाठी खड्डे पाडले जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र निवडणुकीनंतरही होणाऱ्या रस्त्यांवर खड्डे निर्माण होत आहेत. यामध्ये पालिकेच्या नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. अनेक दिवसांनंतर शहरातील रस्ते कारपेट होत असून, खड्डे मात्र पाठ सोडत नसल्यामुळे शहरवासियांमध्ये नाराजी आहे. काही ठिकाणी काढलेले खड्डे व्यवस्थित बुजवलेले नसल्याचे दिसून येते, तर काही ठिकाणी खोदलेले खड्डे बुजवण्यासही पालिकेला सवड मिळाली नसल्याचे दिसून येते.

Web Title: karad potholes issue