गुहागर-विजापूर महामार्गाचा कऱ्हाडला लाभ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

मिरज-लोंढा रेल्वे दुहेरीकरणामुळे शेती व इतर मालांची वाहतूक वाढेल

ओगलेवाडी - कोकण-घाटमाथ्यासह कर्नाटकला जोडणारा ७८ क्रमांकाचा गुहागर-विजापूर या पूर्वीच्या राज्यमार्गाला केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केले आहे. हा मार्ग कऱ्हाड, ओगलेवाडीतून जातो. तसेच पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गावरील रुळाचे दुहेरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले.

मिरज-लोंढा रेल्वे दुहेरीकरणामुळे शेती व इतर मालांची वाहतूक वाढेल

ओगलेवाडी - कोकण-घाटमाथ्यासह कर्नाटकला जोडणारा ७८ क्रमांकाचा गुहागर-विजापूर या पूर्वीच्या राज्यमार्गाला केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केले आहे. हा मार्ग कऱ्हाड, ओगलेवाडीतून जातो. तसेच पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गावरील रुळाचे दुहेरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले.

गुहागर-विजापूर हा सुमारे ३०० किलो मीटरचा महामार्ग आहे. हा मार्ग चिपळूण, पाटण, कऱ्हाड, ओगलेवाडी, कडेगाव, विटा, खानापूर आदी भागातून कर्नाटकातील विजापूरपर्यंत जातो. त्याला आता महामार्गाचा दर्जा देण्यात आल्याने त्याचा लवकरच विकास होणार आहे. तसेच लोकांना दळणवळणाच्या अधिक चांगल्या सेवा-सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वेने पुणे- मिरज-लोंढा रेल्वे मार्गावरील रुळांचे दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेत श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर व पुणे येथे मान्यवरांच्या 
उपस्थितीत व्हीव्हीओ लिंकद्वारा भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच झाला.

या लोहमार्गाच्या दुपदरीकरणामुळे कृषी, पर्यटन व औद्योगिक विकासास चालना मिळणार आहे. दुहेरीकरणाने नव्या गाड्या सुरू होवून शेतमाल व इतर मालांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. कोल्हापूरचा गूळ, सांगली परिसरातील द्राक्षे, हळद, साखर, कऱ्हाड तालुक्‍यातील फळभाज्या, फुले, पालभाज्या, महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी, कोरेगाव तालुक्‍यातील राजमा, लोणंदचा कांदा, नीरेतील अंजिरे आदींची वाहतूक वाढून त्यांचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. कऱ्हाड रेल्वे स्थानकावरून सध्या १२ जलद, चार पॅसेंजर व आठवड्यातून एकदा अशा १८ गाड्यांसह एकूण ३४ गाड्यांची वाहतूक होते. त्यामध्ये आणखी वाढ होवून दळणवळणाची सुविधा अधिक चांगली होईल, अशी अपेक्षा स्थानक प्रबंधक एम. ए. स्वामी यांनी व्यक्त केली.

मिरज ते पुणे लोहमार्गावर ३३ रेल्वे स्थानके आहेत. दुहेरीकरणामुळे जलद रेल्वे गाड्यांचा सध्या ताशी ४० किलोमीटरचा वेग वाढून तो दुप्पट होऊन ८० किलोमीटर होणार असल्याने प्रवासाचा वेळ कमी होईल.
- नाना खामकर, सामाजिक कार्यकर्ते, कऱ्हाड

दुहेरीकरणामुळे नव्या गाड्या सुरू होतील. मालवाहतूक वाढेल, पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाचा कायापालट होईल. रेल्वे गाड्यांचे सध्याचे क्रॉसिंग बंद होणार व होणारा वेळेचा विलंब टळणार आहे.
- गोपाल तिवारी, माजी सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती.

Web Title: karad profit by guhagar-vijapur highway