भाजपचा भ्रमाचा भोपळा अखेर फुटला !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

आठवडाभर चर्चेत असलेल्या दिग्गजांनी प्रवेश न केल्याने चर्चेला उधाण

कऱ्हाड - भाजपमध्ये कऱ्हाड शहरामधीलच नव्हे तर जिल्ह्यातील काही दिग्गजांचा प्रवेश होणार, या इराद्याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मलकापूर येथे झालेल्या मेळाव्यात महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षांसह काहींचा अपवाद वगळता अन्य दिग्गजांचा प्रवेश झाला नसल्याचे दिसून आले.

आठवडाभर चर्चेत असलेल्या दिग्गजांनी प्रवेश न केल्याने चर्चेला उधाण

कऱ्हाड - भाजपमध्ये कऱ्हाड शहरामधीलच नव्हे तर जिल्ह्यातील काही दिग्गजांचा प्रवेश होणार, या इराद्याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मलकापूर येथे झालेल्या मेळाव्यात महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षांसह काहींचा अपवाद वगळता अन्य दिग्गजांचा प्रवेश झाला नसल्याचे दिसून आले.

त्यामुळे मागील आठवड्यापासून ज्यांच्या नावांची भाजप प्रवेशाबद्दल चर्चा होती, त्यांनी प्रवेश न केल्यामुळे त्याचीच चर्चा सध्या सुरू झाली आहे. 
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्या पक्षात मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ सुरू झालेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यावर प्रभुत्व वाढवण्यासाठी त्यांनी जिल्ह्यामध्ये अनेकदा दौरे करून बळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

कऱ्हाड तालुक्‍यात तर नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत दोनदा आणि काल मलकापूर नगरपंचायतीच्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांनी कऱ्हाड तालुक्‍याचा दौरा केला. कालच्या दौऱ्यामध्ये कऱ्हाडसह जिल्ह्यातील अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करणार, असा सूर आठवडाभर आळवला जात होता.

कऱ्हाडमधील काही नगरसेवकांचाही त्यामध्ये समावेश होता. त्यांच्यासह काही राजकीय व्यक्तींच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, त्याला मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर सध्यातरी पूर्णविराम मिळाला. महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह महाबळेश्‍वर, मलकापूरसह जिल्ह्यातील काही आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, काही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी प्रवेश केला. अपवाद वगळता कऱ्हाडसह जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या सुरूंग लागणाऱ्या कुठल्याही मोठ्या राजकीय नेत्याने मात्र प्रवेश केला नसल्याचे दिसले. ज्या राजकीय दिग्गजांची भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा होती त्यांनी प्रवेश न केल्याने पुन्हा त्याचीच चर्चा सुरू झाली आहे.

चंद्रकांत पाटलांनी सावरले! 
जिल्ह्यातील राजकीय दिग्गजांचा मलकापूर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रवेश होणार म्हणून आठवड्यापासून चर्चा सुरू होती. मात्र, मेळाव्यात अपवाद वगळता तसे चित्र दिसले नाही. ही परिस्थिती विचारात घेवून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काहीजणांचा अजून निर्णय न झाल्याने येत्या आठ-दहा दिवसांत मुंबईमध्ये पक्षात प्रवेश करतील, असे सांगून त्यावर अधिक भाष्य करणे टाळत त्यावर पडदा टाकला.

Web Title: karad satara news bjp politics