‘कृष्णा-कोयना’ पाण्याची चव वृत्ताची प्रशासनाकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

कऱ्हाड (सातारा): टेंभु योजनेसाठी कृष्णा नदीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे पाण्याचे वाहने थांबले आहे. तीच स्थितील कृष्णा नदीला लागून असलेल्या बारमाही वाहणाऱ्या कोयना नदीचीही झाल्याने पाण्याला दुर्गंधी येत होती. त्यातच पिण्यासाठीच्या पाण्याचीही चव बदलल्याने नागरीकांत मोठी चर्चा होती. दैनिक 'सकाळ'मध्ये बातमी प्रसिध्द झाल्यावर पालिका आणि प्रशासनाने दखल घेतली. दिवसभर पाणी सोडण्या संदर्भात कार्यवाही सुरु होती. अखेर टेंभु योजनेच्या अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगण्यात आल्यावर त्या योजनेतून अडवण्यात आलेले पाणी सोडण्यात आल्याचे प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांनी सांगितले.

दुष्काळी तालुक्यातील गावांना पाणी मिळावे या हेतूने सरकारने कऱ्हाडजवळुन वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी टेंभू गावच्या पात्रामध्ये अडवण्यात आले आहे. तेथून पाणी उचलण्यसाठी पाण्याची आवश्यक पातळी ठेवावी लागते. ती ठेवण्यासाठी नदीचे वाहते पाणी अडवण्यात येते. अनेक दिवस पाणी अडवण्यात येत असल्याने कृष्णा-कोयना नद्यांच्या पाण्याचे वाहने थांबले जाते. परिणामी पाण्याला दुर्गंधी येवुन ते वापरास अयोग्य होत आहे. त्याचबरोबर नदीच्या पाण्यात अनेक गावचे सांडपाणी मिसळते. त्यामुळे पाणी प्रदुषीत होण्यामध्ये वाढच होत आहे.

पालिकेकडुन नदीचेच पाणी शुध्दीकरण करुन पिण्यास दिले जाते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्याही पाण्याची चव बदलली आहे. शेवाळासारखा वास पाण्याला येवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यासंदर्भात 'सकाळ'ने बातमी प्रसिध्द केली. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फुटुन त्याची दखल पालिका आणि प्रशासनाकडून घेण्यात आली. दक्ष कऱ्हाडकर या व्हॉट्सऍप ग्रुपवरही बातमीतील विषयाच्या अनुशंघाने टिकात्मक चर्चा झाली. त्याचीही दखल घेण्यात आली. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे व नगरसेवकांची या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी या प्रश्नासंदर्भात प्रांताधिकारी श्री. खराडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनीही संबंधित पाण्यासंदर्भात टेंभुच्या अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती लक्षात आणुन दिल्यानंतर पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पालिकेचे आवाहन
कृष्णा-कोयनेचे पाणी अडवण्यात आल्याने पाणी दुषीत झाले आहे. पालिकेमार्फत पाणी शुध्द करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुरवठा केले जाणारे पाणी अणुजैविकदृष्ट्या शुध्दच आहे. तरीही नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणुन पिण्याचे पाणी उकळुन व गाळुन प्यावे. त्याचबरोबर शुध्द पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी सोडण्याच्या वेळेतही बदल होवु शकतो, असे पालिकेतर्फे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी कळवले आहे.

Web Title: karad satara news krishna koyana river water taste change news effect