व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी ॲपद्वारे ऑनलाइन बुकिंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

कऱ्हाड - चांदोली व कोयना राष्ट्रीय अभयारण्यात साकारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासनाने त्याच्या माहितीचे ॲप विकसित केले आहे. ‘भ्रमंती’ असे त्या ॲपचे नाव आहे. त्यावरून व्याघ्र प्रकल्पात फिरायला येण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

भ्रमंती ॲप मोबाईलच्या प्ले स्टोर वरून मोफत डाउनलोड करता येते. त्या ॲपवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबत सगळी माहिती व ज्या हौशी पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात ट्रेकिंग करायचे असेल त्यांच्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सोय दिली आहे. एका वेळेस १२ जणांच्या ग्रुपला त्या ॲपद्वारे बुकिंग करता येईल, वन्यजीव विभाग बुकिंग केलेल्या ग्रुपसोबत प्रशिक्षित गाइड देणार आहे. ऑनलाइन पैसे व ट्रेकिंग रूटही बुकिंग करण्याची सुविधा ॲपमध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्या ॲपमध्ये व्याघ्र प्रकल्प काय आहे, त्याचे भाग किती व ज्या त्या परिसराची माहिती उपलब्ध आहे. त्या शिवाय त्या परिसरात पक्षी, प्राणी, वनस्पती, ट्रेकिंगचा नकाशा, ऐतिहासिक माहिती, स्थानिक निवास व भोजन व्यवस्था अशी माहिती उपलब्द करून दिली आहे. यासह अनेक नवीन सूचना व सुधारणांचाही त्या ॲपमध्ये वन्यजीव विभाग समाविष्ट करणार आहे. त्या ॲपमुळे त्या त्या भागातील स्थानिकांना येणाऱ्या पर्यटकांचा फायदा होणार आहे.

...असे पाहा ॲप 
ॲँड्रॉइड मोबाईलवर प्ले स्टोअरमध्ये जायचे. तेथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प-भ्रमंती असे इंग्रजीत टाइप करा. तेथे तुम्हाला व्याघ्र प्रकल्पाची छायाचित्रे दिसतील. त्यावर क्‍लिक केल्यास ते ॲप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करा. ते इन्स्टॉल झाले की, ते ॲप रन करा. तुम्हाला पश्‍चिम घाटातील सौंदर्याचा खजिना उपलब्ध दिसेल. त्यात नाव, मोबाईल क्रमांक व मेलआयडी टाकल्यास तुम्ही बुकिंगही करू शकता. 

Web Title: karad satara news online booking on tiger project tourism app