#SataraFlood अद्यापही 15 गावातील स्मशानभुमी पाण्यात 

#SataraFlood अद्यापही 15 गावातील स्मशानभुमी पाण्यात 

कऱ्हाड ः कऱ्हाड तालुक्यात महापुराने हाहाकार उडाला आहे. अनेक गावात पाणी घुसल्याने घरेही पाण्यात आहेत. तालुक्यातील अनेक गावे पुरग्रस्त झाली आहेत. यामुळे गावांतील नदी आणि ओढ्याकाठच्या स्मशानभुमी पाण्यात गेल्या आहेत.
कऱ्हाड-पाटण तालुक्यात महापुराने अनेक गावांना वेढा दिला आहे. त्यामुळे त्या गावातील दैनदिन जीवन विस्कळीत झाली आहे. संबंधित गावातील पुराचे पाणी घुसल्याने अनेक कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर गावातील अनेक जुन्या मातीच्या घरांची पडझड सुरु झाली आहे. त्याचा मुकाबला सध्या संबंधित पुरग्रस्त गावातील लोक करत आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनाची घडी विस्कटली असुन अनेक गावातील लोकांसमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर विशेषतः दोन्ही तालुक्यातील नदी, ओढ्याकाठच्या स्मशानभुमींना त्याचा मोठा फटका बसला आहे. काही गावात दफनभुमीही पाण्यात गेल्याने त्याचेही संबंधित समाजातील अंत्यसंस्काराचे प्रश्न निर्माण झाला आहे. पुरग्रस्त तांबवे गावातील काटवटे कुटुंबातील एकाचे परवा निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार स्मशानभुमीत करण्यात आले होते. मात्र तीन दिवसापासुन स्मशानभुमीच पाण्यात असल्याने संबंधितांचे रक्षाविसर्जन दुसरीकडेच करायची वेळ आली आहे. त्यामुळे लोकांसमोर स्मभानभुमीतील पाण्याचा मोठा प्रश्न उभा आहे. तालुक्यातील तांबवे, गोटे, पोतले, कापील, पाचवडवस्ती, शेरे, रेठरे बुद्रुक, येरवळे, कवठे, म्होप्रे, खोडशी, जाधवमळा, कोपर्डे हवेली, आटके, केसे, कोडोली ही गावे पुरग्रस्त झाली आहेत. संबंधित गावापैकी तांबवे, घोणशी, कोपर्डे हवेली, सुपने, कोडोली, गोवारे, सैदापुर यासह काही गावातील स्मशानभुमी पाण्यात गेल्या आहेत. त्यामुळे त्या गावातील लोकांसमोर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com