ऊस तोडणी कामगारांच्या बोगस कर्ज प्रकरणी दोघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

कऱ्हाड- ऊस तोडणी कामगारांच्या बोगस कर्ज प्रकरणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना सोमवारी (ता. 13) रात्री उशिरा अटक झाली.

दोघांना आज न्यायलयात हजर करण्यात येणार आहे. 2014-15 मध्ये त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात कर्जप्रकरण झाले होते. ते बोगस असल्याची तक्रार तांबवे (ता. वाळवा) येथील एकाने शहर पोलिसात दिली होती. त्या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी श्री. मोहिते, श्री. पाटील यांनी अर्ज केला होता. तो काल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश एम. आर. देशपांडे यांनी फेटाळून लावला. त्यानंतर दोघांना अटक झाली आहे.

Web Title: karad: two arrested for alleged bogus loan workers

टॅग्स