कर्डिलेंना न्यायालयीन कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

नगर - पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्लाप्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह 17 जणांना न्यायालयाने आज 27 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली, तर इतर चार आरोपींना तीन दिवस पोलिस कोठडी दिली. प्रत्येक आरोपी सीसीटीव्ही फुटेज पाहून ओळखीच्या आरोपीची नावे सांगत आहेत. दरम्यान, जमावाला काही आरोपींनी चिथावणी दिल्याने काही लोकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. पोलिसांच्या ताब्यातील आमदार संग्राम जगताप यांना उचलून घेऊन जाणे, कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध 225, 152, 109, अशी वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. 

Web Title: kardile judicial custody