कऱ्हाडमध्ये भाजपकडून मिशन 2019 साठी राजकीय व्यूव्हरचना

सचिन शिंदे 
मंगळवार, 5 जून 2018

कऱ्हाड : शहरात वेगवगेळ्या माध्यामातून होणाऱ्या राजकीय कुरघोड्यांमागे विधानसभेसाठीची व्यूव्हरचना असल्याचे वांरवार समोर येत आहे. भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मीणी मंदीर ट्रस्टला मिळालेला राज्यमंत्रीपदाचा दर्जानंतर त्यांच्या स्वागतावेळी झालेल्या खेळीमागे भाजपकडून आखलेल्या व्यूव्हरचान स्पष्ट होत आहेत. दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून अडचणी आणण्यासाठीच्या आखल्या जाणाऱ्या व्यूव्हरचनामागे त्यांची ताकद ढिली करण्याचाच घाट घातला जातो आहे.

कऱ्हाड : शहरात वेगवगेळ्या माध्यामातून होणाऱ्या राजकीय कुरघोड्यांमागे विधानसभेसाठीची व्यूव्हरचना असल्याचे वांरवार समोर येत आहे. भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मीणी मंदीर ट्रस्टला मिळालेला राज्यमंत्रीपदाचा दर्जानंतर त्यांच्या स्वागतावेळी झालेल्या खेळीमागे भाजपकडून आखलेल्या व्यूव्हरचान स्पष्ट होत आहेत. दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून अडचणी आणण्यासाठीच्या आखल्या जाणाऱ्या व्यूव्हरचनामागे त्यांची ताकद ढिली करण्याचाच घाट घातला जातो आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून स्थानिक पातळीवर नेत्यांकडून होणाऱ्या हालचालींना विधानसभेच्या राजकारमाचीच झालर आहे. पालिकेत पृथ्वीराज चव्हाण यांना एकटे पाडले, आता मलकापूरमध्य़ेही सत्ता काबीज करून विधानसभेचे मिशन 2019 फत्ते करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. 

माजी मुख्यंमत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या एकत्रीकरणांच्या वाऱ्यानंतर भाजप हडबडून जागे झाले.विशेष करून भोसले गटाने ते गांभीर्याने घेतले आहे. शेणोली येथे झालेल्या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते, उदयसिंह पाटील-उंडाळकर एकाच व्यासपीठावर होते. त्यातून सोशल मिडीयावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्याची दखल राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. त्यात भाजपमध्येही त्याचे पडसाद उमटले.

दक्षिण भागातील राजकारणासाठी वेगळी व्यूव्हरचना आखली पाहिजे, असा संदेश वरिष्ठ पातळीवर देण्यात आला. राष्ट्रवादी व कॉग्रेसने एकत्रीत आल्यानंतर काय चित्र होईल, हा भाग निराळाच होता. मात्र त्यांच्या सोबत उंडाळकर गट मिळाल्यास मात्र वेगळे दिसेल, अशा अंदाज आळेल्या भाजपच्या भोसले गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच अतुल भोसले यांच्याकडे अशलेल्या विठ्ठल रूक्मीणी मंदीर ट्रस्टला राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याने पुन्हा भाजपची ताकद वाढली आहे. अतुल भोसले यांच्या स्वागाताला कॉग्रेसप्रणीत नगरेसवकांची उपस्थीती होते. त्यामागे राजकीय खेळीसह दबावतंत्र असल्याचीही चर्चा आहे.

भाजपकडून आखल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या खेळी निव्वळ दक्षिणची विधानसभा जिंकण्यासाठीच होत असल्याचे दिसते आहे. राज्यमंत्रीपदाचा दर्जा, वाकुर्डेच्या पाणी प्रश्नाचे श्रेय यात बाजी मारणाऱ्या भाजप वभोसले गटाने आता मलकापूरच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. तेथे पृथ्वीराज चव्हाण यांची ताकद ढिली करण्यासाठी ते राजकीय खेळी आखत आहेत. त्याला तोड देण्यासाठी चव्हाण गटही सज्ज आहे. कऱ्हाड पालिका, मलकापूर नगरपंचायत येथे होणाऱ्या हलचालींसह तालुक्यातील विविध प्रश्नावरून होणारे श्रेयवाद अशा सगळ्याच गोष्टीला आगामी 2019 च्या विधानसभेचीच झालर दिसते आहे. 

अतुल भोसले यांच्या स्वागतासाठी लावलेल्या फ्लेक्सवर पालिकेतील जनशक्तीच्या नगरसेवकांची नावे होती. त्यात काही नेत्यांचे फोटोही होते. ते फोटो कोणी लावले, त्या फलकाचा नक्की काय उद्देश होता याबाबत त्यातील फ्लेक्सवरील काही नेत्यांनाही त्याची कल्पना नव्हती. अनेकांनी आवर्जून प्रत्यक्ष फ्लेक्स पाहिल्यानंतर आपले नाव व तेथे फोटो असल्याची कल्पना मिळाली होती. त्यामुळे हायजॅक राजकारणाचीच खेली येथे होताना दिसते आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karhad bjp political planning for 2019