कऱ्हा़डला हाॅकर्स झोनचा गुंता वाढला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

कऱ्हाड : हाॅकर्स झोन ठरवण्यासाठी पालिका, पोलिस व हातगाडेधारकांची आयोजित केलेली बैठक फिस्कटली. जागा देण्याच्या मुद्दावरून एकमत न झाल्याने बैठत निष्फळ ठरली. त्यामुळे हातगाडेधारकांनी  आजपासून जेथे गाडे होते त्याच ठिकाणी लावणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पालिका काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.

पालिका, पोलिस व हातगाडे धारक एकत्रीत शहरात फीरून पहाणी करणार होते. तेही न शक्य न झाल्याने दिवसभर केवळ चर्चेचे गुऱ्हाळ झाले. त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याने कऱ्हाडातील हाॅकर्स झोनचा गुंता वाढला आहे. लोकप्रतिनिधीनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याने निर्णय होवू शकला नाही. दोन दिवसापूर्वी पालिकेने अतिक्रमण हटाव मोहिम राबवून कृष्णा चे कोल्हापूर नाका रस्त्यावरील अतिक्रमणीत हातगाडे हटवले होते. त्यातून हाॅकर्स झोन ठरवण्याच्या चर्चेने गती घेतली होती. त्यात कर्मवीर भाऊराव पुतळ्याच्या रस्त्याला हाॅकर्स झोनचा प्रस्ताव पालिकेने दिला होता. त्या प्रस्तावाला हातगाडे धारकांनी होकार दिला होता. मात्र तेथील रहवाषी व व्यापाऱ्यांचा वाढचा विरोध लक्षात घेवून ते शक्य नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी घुमजाव केले. त्यामुळे हाॅकर्स झोन ठरवण्यासाठी बैठक झाली. मात्र जागा देण्याच्या मुद्दावर एकमत न झाल्याने ती बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे हातगाडेधारक संतप्त झाले आहेत. त्यांनी जीथे होते तेथेच आजपासून गाडे लावण्याचा निर्णय बैठक घेवुन जाहीर केला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या भुमिकेकडे लक्ष लागून आहे.

Web Title: karhad hawkers zone in problem