कऱ्हाड पालिका बांधणार कर्मचाऱ्यांसाठी घरे 

कऱ्हाड पालिका बांधणार कर्मचाऱ्यांसाठी घरे 

कऱ्हाड : पालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग तीन व चतुर्थ श्रेणीत कार्यरत कर्मचाऱ्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून पार्ले येथील दहा हेक्टर तीस आर क्षेत्रात घरे बांधून देण्याचा ठराव पालिकेच्या आज झालेल्या मासिक बैठकीत मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.

पालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवतीचा परिसर विकसीत करण्याचा ठरावही यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्पर्धेत देशात पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दलही पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तारातील नागरीक, विविध संस्थाच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

पुरस्कार मिळवण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, सर्व अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था, शाळा, विद्यालये, महाविद्यालये आणि शहरातील महिला व पुरूष, स्वच्छता दूत, व नागरिकांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे पुरस्कार मिळवणे शक्य झाले आहे. यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी पालिकेने पुरस्कार मिळवल्यामुळे यापुढील कालावधीत देशातील विविध शहरे, नगरपालिका, पर्यटक, नागरिक येथे पाहण्यासाठी येतील, त्यामुळे शहरातील स्वच्छतेत सातत्य राखण्याची मोठी जबाबदारी पालिकेवर आली आहे. ती सर्वांनी मिळून पार पाडूया.

पालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर सन 1972 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला आहे. तेथील फरशा आणि रेलींग विकसीत करून सुशोभित करण्याचा ठराव मंजूर झाला. पालिकेतील एकाच पदावर सलग 12 ते 24 वर्षे कार्यरत असलेल्या 13 कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात यावी, असाही ठराव झाला. आस्थापनेवरील तीन, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पार्ले येथे पालिकेच्या दहा हेक्टर क्षेत्राचा शेती झोन वगळून रहिवास झोन करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com