कऱ्हाड पालिकेत साडेअकरा लाखाचा अपहार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

एकाने अपहाराची रक्कम भरली 
करवसुली विभागातील संबधित कर्मचाऱ्यांपैकी एकाने आठ लाखांचा तर दुसऱ्याने चार लाखांचा अपहार केला आहे. त्यात चार लाखांचा अपहार करणाऱ्याने त्याची रक्कम पालिकेत जमा केली आहे. मात्र आठ लाखांचा अपहार करणाऱ्याने अद्यापही रक्कम भरलेली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल होणार की, फक्त एकावरच तो दाखल केला जाईल, तेही लवकरच स्पष्ट होईल.

कऱ्हाड : नागरीकांनी भरलेल्या कर वसुली विभागात दोन वर्षात सुमारे साडेअकरा लाखांहून अधिक रूपयांचा अपहार करणाऱ्या पालिकेच्या दोघा कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल पाऊल पालिका प्रशासनाने आज उचलले. त्याबाबत कर वसुली प्रमुख उमेश महादर यांनी पोलिसात महत्वाची कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यानुसार संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया पोलिसांनी सुरू केली आहे. राजेंद्र शिंदे व भरत पंचारिया अशी संबंधित दोघा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मार्च 2016-17 व 2017 -18 अशा दोन वर्षात अपहार केल्याचा ठपका त्या दोघांवर ठेवण्यात आला आहे. 

पोलिकेच्या कर वसुली विभागात संबधित दोन्ही कर्मचारी आहेत. त्या दोघांकडे शहरातील काही महत्वाच्या भागातील करवसुली देण्यात आली होती. ती करवसुली करताना त्या दोघांनाही संगनमताने 2016-17 मध्य़े आठ लाखाहून अधिक तर 2017-18 मध्ये चार लाखावर रूपयांचा अपहार केला आहे. त्याबाबत प्रशासनाच्या ती गोष्ट लक्षात आली. त्यावेळी त्या दोघांकडे संबधितांनी चौकशी केली. त्यात तथ्य आढळ्याने पालिकेने एक सदस्यीय समिती नेमली. समितीकडून संबधित दोन्ही कर्मचाऱ्यासह पालिकेतील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले. त्या समितीकडून अपहार झाला आहे, असा अहवाल पालिका प्रशासनास प्राप्त झाला. त्यानुसार पालिका प्रशासनाने त्याबाबतची माहिती लोकप्रतिनिधींनाही दिली.

त्यानुसार सर्वानुमते त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यानुसार 31 ऑगस्ट पालिकेच्या सर्वसाधारण सभेत संबंधित दोघाही कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. त्यानंतर पालिकेतर्फे पोलिसांना आठवड्यापूर्वी तसे पत्रही पोलिसांना देण्यात आले होते. त्यात कायदेशीर कारवाई करण्याबाबत स्पष्ट म्हटले होते. पालिकेने आज त्याबाबत आक्रमक होत पोलिसात धाव घेतली. त्यानुसार करवसुली विभागप्रमुख श्री. महादर यांनी पोलिसात त्याबाबत लेखी जबाब दिला आहे. त्यांनी काही महत्वाची कागदपत्रेही पोलिसांना दिली आहेत. त्यानुसार पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. कागदपत्रांची तपासणी करून उद्यापर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यात पोलिसांनी वर्तविला आहे. 

एकाने अपहाराची रक्कम भरली 
करवसुली विभागातील संबधित कर्मचाऱ्यांपैकी एकाने आठ लाखांचा तर दुसऱ्याने चार लाखांचा अपहार केला आहे. त्यात चार लाखांचा अपहार करणाऱ्याने त्याची रक्कम पालिकेत जमा केली आहे. मात्र आठ लाखांचा अपहार करणाऱ्याने अद्यापही रक्कम भरलेली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल होणार की, फक्त एकावरच तो दाखल केला जाईल, तेही लवकरच स्पष्ट होईल.

Web Title: Karhad municipal fraud case