कऱ्हाडातील जुगार अड्डे उध्वस्त; पोलिसांची कारवाई

सचिन शिंदे 
मंगळवार, 8 मे 2018

शहरासह लगतच्या उपनगरात व काही ग्रामीण भागात मोठ्या प्रमामात तीन पानी जुगाराचे अड्डे सुरू होते. त्यावर कारवाईचा धडाका हाती घेत उपाधिक्षकस कार्यालयाने त्या विरोधात मोहिम उघडली आहे.
 

कऱ्हाड - पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या पथकाने आतापर्यंत महिनाभरात केलेल्या कारवाईत सुमारे पंधरापेक्षा जास्त तीन पानी जुगार अड्डे उध्वस्त केले आहेत. त्यात सुमारे 33 जणांना अटक झाली असून त्यात सुमारे सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कारवाई होत असून अड्डे चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाईचे प्रस्तावही पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. शहरासह लगतच्या उपनगरात व काही ग्रामीण भागात मोठ्या प्रमामात तीन पानी जुगाराचे अड्डे सुरू होते. त्यावर कारवाईचा धडाका हाती घेत उपाधिक्षकास कार्यालयाने त्या विरोधात मोहिम उघडली आहे.

अवघ्या दोन महिन्यात कारवाईचा धडाका करत पंधरापेक्षा जास्त तीन पानी जुगाराचे अड्डे पोलिसांनी उध्वस्त केले आहेत. 33 जणांवर गुन्हा दाकल करून त्यांच्यावर कारवाईचे प्रस्ताव ठेवले आहेत. कारवाईत सुमारे सहा लाख 54 हजारांचा मु्द्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कारवाईवेळी पळून जाणाऱ्यांनाही पाठलाग करून पोलिसांनी अठक केली आहे. शहरातील वाढीव हद्दीतील अनेक बागात छापे टाकले आहेत. त्याशिवाय मलाकपूरसह ओगलेवाडी, करवडी, विरवडे भागात सातत्याने कारवाई करत त्या विरोधातील मोहिम पोलिसांनी हाती घेतली आहे.

 * पोस्टल कॉलनीतील छापा - आठ संशयित अटकेत - एक लाख आठ हजार 986 मुद्देमाल जप्त 

* गोळेश्वर बर्गेवस्ती छापा - चार संशयित अटकेत - दोन लाख 89 हजार 390 मुद्देमाल जप्त

* आगाशिवनगर दांगट वस्ती छापा - सहा संशयित अटकेत - एक लाख 26 हजार 440 मुद्देमाल जप्त 

* सैदापूर सुर्या हॉटले मागे छापा - नऊ संशयित अटकेत - एक लाख 6 हजार 850 मुद्देमाल जप्त 

* करवडी, विरवडे येथे छापा - सहा संशयित अटकेत - 26 हजार 9600 मुद्देमाल जप्त

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: karhad police destroys gambler place

टॅग्स