कऱ्हाड - तीनशे किलो प्लॅस्टीकच्या पिशव्या जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - प्रदुषण नियंत्रण महामंडळ व पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दत्त चाकातील छत्रीवाले मोतीलाल यांच्या दुकानावर छापा टाकून सुमारे तीनशे किलो प्लॅस्टीकच्या पिशव्या जप्त केल्या. तसंबदित व्यापाऱ्यास पाच हजारांचा दंड करण्यात आला आहे. गणोशोत्सव काळात प्लस्टीकचा वापर न करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. त्या पार्श्वभुमीवर पालिका सतर्क आहे. त्यातूनच दररोज छापे टाकले जात आहेत. परवा नंतर लगचेचेच आजचा चापा टाकण्यात आला आहे. 

पालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम मारूती काटरे, सुरेश शिंदे, अबीजीत खवळे, रामा शिंदे, संजय भोसले, मनोज गायकवाड यांच्या पथकाने कारवाई केली. त्याबाबत प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी समन्वय साधून कारवाईत सहभाग घेतला. प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिदारी प्रशांत बोसेल व त्यांचे सहकारी मलकापूर येथे आले होते. त्यावेळी त्यांना मोटी प्लॅस्टीकची पिशवी दिसली. त्यांनी त्याबाबत चोकसी केली अशता, ती छत्रीवाले मोतीलाल यांच्या दुकानातून खरेदी केल्याचे सांगण्यात आले. त्यांनी त्वरीत पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली. आरोग्य सभापती प्रियांका यादव यांनाही त्याची कल्पना देण्यात आली. त्यानंतर श्री. काटरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे जावून छापा टाकला. त्यावेळी तेथे तीनशे किलो प्लॅस्टीकच्या पिसव्या सापडल्या. त्या पालिकेने जप्त केल्या आहेत. त्या पालिकेत आणल्या. संबदित व्यापाऱ्यास पाच हजारांचा दंडही आकरण्यात आला आहे,

Web Title: Karhad - Three hundred kg plastic bags seized