दुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू

अण्णा काळे 
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

करमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी सुरू केली आहे. निसर्गाने कितीही हुलकावण्या दिल्यातरी आपल्यातील आशावाद जीवंत ठेवणारा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. 

दिवसभर कडक ऊन पडत आहे. तरीही काळ्या आईची ओटी भरली पाहिजे या भावनेने शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी सुरू केली आहे. जुन, जुलै, ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. 15 सप्टेंबरच्या आसपास काहीभागात थोडा पाऊस झाला. आता पाऊस पडेल अशी आशा वाढली असतानाच शेतकऱ्यांनी थेट पेरणीलाच सुरवात केली आहे. 

ज्वारीच्या उत्पादनात करमाळा तालुका अग्रेसर आहे. या भागातील ज्वारीला पुणे, नगर भागात विशेष मागणी आहे. 10-15 दिवसांत पाऊस झाला नाही तर पेरलेले बी मातीत जाणार आहे. करमाळा तालुक्‍याचा उजनी पट्टा सोडता इतरत्र पाणीटंचाई आहे. दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू असल्याने पूर्व भागालाही दिलासा मिळाला आहे. मात्र, उर्वरित तालुका कोरडाच आहे. 

सर्वात कमी पाऊस पडण्याची भीती 

करमाळा तालुक्‍याची पावसाची वार्षिक सरासरी 545 मिमी आहे. गेल्या 10 वर्षांतील पावसाची आकडेवारी खालीलप्रमाणे. (करमाळा तहसीलकडील नोंदीनुसार) 
पडलेला पाऊस व कंसात वर्ष 
730 मिमी (2008), 802 मिमी (2009), 985 मिमी (2010), 641 मिमी (2011), 268 मिमी (2012), 302 मिमी (2013), 418 मिमी (2014), 375 मिमी (2015), 402 मिमी (2016), 530 मिमी (2017) अशाप्रकारे वार्षिक सरासरी पर्जन्यमान राहिले आहे. यावर्षी आतापर्यंत एकूण सरासरी 127 मिमी पाऊस झालेला असून त्यामध्ये जून (67 मिमी), जुलै (20 मिमी), ऑगस्ट (21 मिमी), सप्टेंबर आतापर्यंत (19 मिमी). 

यापुढे पाऊस पडेल की नाही काहीच माहिती नाही. पेरणी तर केलीच पाहिजे. पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी माणसांचे, जनावरांचे हाल होतील. 
- दादासाहेब सुरेश जाधव, शेतकरी, 
वीट, ता. करमाळा 

सूर्यफूल, मका पार वाया गेले आहे. आताही ज्वारी उगवून येईल की नाही सांगता येत नाही. मात्र, बसून तरी काय करणार, पेरणीचे दिवस आहेत. 
- बिरू पाडुळे, शेतकरी, विहाळ, ता. करमाळा

Web Title: In Karmala Farmers are in hope