ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे वाचले 65 प्रवाशांचे प्राण

ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे वाचले 65 प्रवाशांचे प्राण

पुणे : सोलापूर पुणे द्रतगती महामार्गावर राज्य परिवहन विभागाच्या (एस. टी. महामंडळ) बस क्रमांक एम. एच. 14 बीटी 3248ला जबर अपघात झाला. मात्र चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांना कुठलीही हानी पोचली नाही.

सविस्तर माहिती अशी की, करमाळा जि. सोलापूर डेपोची दुपारी 12 वाजता सुटलेली करमाळा-स्वारगेट बस कुरकुंभच्या पुढे आली असता कंटेनर विरूद्ध बाजूने चुकीच्या पदधतीने आडवा घुसला. यावेळी बस देखील वेगात अंतर कापत असल्याने कंटेनरवर धडकनार इतक्यात चालक ज्ञानेश्वर श्येटे चालक क्रमांक 7595 यांनी समयसुचकता दाखवत बस दुभाजकावरून विरूदध बाजूला घेत बसमध्ये बसलेल्या जवळजवळजवळ 65 प्रवाशांचे प्राण वाचले. यावेळीे बसमधील 02 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. प्रवाशांनी चालक ज्ञानेश्वर श्येटे यांचे मनोमन धन्यवाद मानले.

या आठवडयात आलेल्या लागोपाठच्या सुट्यांमुळे सगळ्या बसेस गर्दीने फुल असल्याने प्रवाशांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. दरम्यान ही बस प्रवाशांनी पूर्ण भरलेली होती. या बसमध्ये जवळपास 50 प्रवाशी सिटींग तर 15 प्रवाशी हे स्टॅडिंग प्रवास करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com