गोकाक, अथणी, कागवाड विधानसभा पोटनिवडणुकीत 'हे'  रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

मंगळवारी (ता. 19) झालेल्या छाननीवेळी 21 अर्ज अवैध ठरले. त्यामुळे, 44 अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर आहे. त्यादिवशी सायंकाळी लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

बेळगाव - विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील दिग्गजांचे अर्ज वैध ठरले. पोटनिवडणुकीसाठी तिन्ही मतदारसंघातून एकूण 65 अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी (ता. 19) झालेल्या छाननीवेळी 21 अर्ज अवैध ठरले. त्यामुळे, 44 अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर आहे. त्यादिवशी सायंकाळी लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

गोकाकमधून एकूण 24 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामधील 10 अर्ज बाद ठरल्याने केवळ 14 अर्ज वैध राहिले आहेत. त्यात रमेश जारकीहोळी (भाजप), लखन जारकीहोळी (कॉंग्रेस), अशोक पुजारी (धजद), दीपक उर्फ श्रीव्यंकटेश्‍वर महास्वामी (हिंदुस्थान जनता पार्टी), संतोष नंदूर (उत्तम प्रजाकीय पक्ष), अशोक हंजी, गुरुपूत्र कुल्लूर, प्रकाश बागोजी, रामाप्पा कुरबेट, सतीश पुजारी, संजय कुरबेट (सर्व अपक्ष) यांचा समावेश आहे. एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करणाऱ्यांचा प्रत्येकी एक अर्ज वैध ठरविण्यात आला आहे. 

अथणीत हे आहेत रिंगणात

अथणीत 25 अर्ज दाखल झाले होते. त्यामधील 20 अर्ज वैध ठरले. त्यात गजानन मंगसुळी (कॉंग्रेस), गुरप्पा दाशाळ (धजद), महेश कुमठळ्ळी (भाजप), दाऊलसाब नदाफ (राष्ट्रीय महिला पक्ष), नागनाथ (उत्तम प्रजाकीय पक्ष), विनायक मठपती, अज्जप्पगोळ बाहुबली, इम्रान पटेल, गुरुपूत्र कुळ्ळूर, रवी पडसलगी, रसूलसाब नदाफ, राजू ढवरी, शहाजान डोंगरगाव, सिद्रामगौडा पाटील, श्रीशैल हळ्ळदमळ, सदाशिव बुटाळे (सर्व अपक्ष) यांचा समावेश आहे. तर सत्याप्पा बागेण्णावर व अण्णाराय हलळ्ळी यांचे अर्ज अवैध ठरले. 

कागवाडमध्ये हे आहेत रिंगणात

कागवाड मतदारसंघातून 17 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील 10 अर्ज वैध ठरले आहेत. राजू कागे (कॉंग्रेस), श्रीमंत पाटील (भाजप), श्रीशैल तुगशेट्टी (धजद), विवेक शेट्टी (पंचम बहुजन आघाडी), सचिन अलगुरे (उत्तम प्रजाकीय पक्ष), अर्चना मोळेकर, अमोल सरडे, दीपक बुर्ली, मुरगेप्पा देवरेड्डी, संदीप कांबळे अशी वैध ठरलेल्यांची नावे आहेत. उमेदवारी अर्ज गुरुवारपर्यंत (ता. 21) मागे घेता येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka Assembly Bye-Election 2019 In Athani Kagwad Gokak