महाराष्ट्रास पाणी देण्याचे येडियुरप्पा यांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा करून पाणी देऊ, असे आश्वासन कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिले.  

जत - कर्नाटक सीमा भागात तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी आले आहे. यातून महाराष्ट्रातील जतच्या पूर्व भागात पाणी देण्यासाठी काही शिष्ठमंडळांनी आपल्याकडे पाठपुरावा केला आहे. या दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा करून पाणी देऊ, असे आश्वासन कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिले.  

Vidhan Sabha 2019 : महात्‍मा फुले, सावरकरांना ‘भारतरत्‍न’ दिलाच पाहिजे 

भाजप, शिवसेना, रिपाई व रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ संख येथे सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार विजयगौडा पाटील, आमदार विलासराव जगताप, रिपाई जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, रासप जिल्हाध्यक्ष मारूती सरगर, आर. के पाटील, सभापती सुशीला तावशी, आप्पासाहेब नामद, सरदार पाटील, अॅड.चन्नाप्पा होर्तिकर, अजित पाटील आदी उपस्थित होते. 

Vidhan Sabha 2019 : घरे ७, मतदार २२ अन्‌ विकास सात कोस दूर!  (व्हिडिओ) 

मुख्यमंत्री येडीयुरप्पा म्हणाले, जात, धर्म, पंथ याला बळी पडू नका. देशात, दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे. येणाऱ्या काळात ही भाजपचे सरकार महाराष्ट्रात येणार आहे. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केले.

चंदगड तालुक्‍यातील सुमारे १५० मुलींना करावी लागते शिक्षणासाठी पायपीट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka Chief Minister Yeddyurappa promises to give water to Maharashtra