सांगलीतील खरसुंडीच्या मंडलाधिकारी लाच घेताना ताब्यात 

सांगलीतील खरसुंडीच्या मंडलाधिकारी लाच घेताना ताब्यात 

सांगली - आटपाडी तहसील कार्यालयातील उपलेखापाल श्रीमती शमशाद रफिक तांबोळी यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. यासंदर्भात एका शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली होती. 

तांबोळी यांच्याकडे खरसुंडी मंडलाच्या मंडलाधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार आहे. या मंडलातील एका शेतकऱ्याने खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्याला नोंद घालण्यासाठी तांबोळी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. तो नोंदवण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असता ती खरी असल्याचे आढळले. त्यानुसार आज सकाळी आटपाडीत प्रशासकीय इमारत आणि साठे चौकातील ओम साई हॉटेल येथे सापळा लावला. तांबोळी यांनी पाच हजार रुपये स्विकारले असता रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com