वाटेगाव, कुरळपला पावसाने नुकसान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

झाड उन्मळून बेकरी, पानटपरी जमीनदोस्त - उसासह खरीप पिकांची हानी

कासेगाव - मुसळधार पावसामुळे वाटेगाव (ता. वाळवा) येथील बसस्थानकावरील वडाचे झाड मुळापासून उन्मळून पडले. शीतपेयाचे दुकान, बेकरी व पानटपरी जमीनदोस्त झाले. यात तीन लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने जीवित हानी टळली. तसेच, कुरळप परिसरात दोन झाडे उन्मळून पडली. यामुळे मोठ्या प्रमाणत वाहतूक 
ठप्प होती.

वाटेगावमध्ये बऱ्याच विश्रांतीनंतर पावसाचे आगमन झाल्यानंतर गुरुवारी (ता. ७) रात्री अकराला बसस्थानकाजवळील जुने वडाचे झाड मुळापासून उन्मळून पडले. सुदर्शन विष्णू येसुरके यांचे शीतपेयाचे दुकान, बेकरी व विनोद कांबळे यांच्या पानटपरीवर झाड पडल्याने आतील फ्रीज व खाऊच्या किमती साहित्याचे मोठे नुकसान झाले. बसस्थानकावर नेहमी प्रवाशांची गर्दी असते. रात्री झाड पडल्याने जीवित हानी टळली. तलाठी राजेंद्र पाटील, ग्रामसेवक एस. बी. सानवेकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला.

कुरळप - परिसरात झालेल्या अर्ध्या तासाच्या पावसात नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आज सकाळपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा होता. दुपारी चारच्या सुमारास विजांचा कडकडाट, प्रचंड वाऱ्यासह तुफान पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. रस्त्याच्या कडेला असणारी अनेक झाडे उन्मळून पडली. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. वशी-कुरळप रस्त्यावर भालकर मळा भागात दोन वृक्ष उन्मळून पडले. माजी उपसरपंच इक्‍बाल मुलानी, राहुल भालकर, सलमान मुलानी, अनिल सपकाळ, सरदार मुलानी, राजेंद्र गायकवाड, जमीर मुलानी आदींनी एकत्र येत रस्त्यावर पडलेली झाडे तोडून बाजूला केली. यामुळे रस्ता वाहतुकीस मोकळा झाला. रस्त्यावर झाडे पडल्याने बहुतांश वाहनांना वशी-लाडेगाव-कुरळप फाट्यावरून वाहतूक करावी लागली.

Web Title: kasegav news vategav kurlap loss by rain