जिल्ह्यात ४० हजार क्विंटल बियाणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

खरिपासाठी ८५ हजार टन खतही बाजारात; ज्वारी बियाण्यांचा मात्र तुटवडा?

काशीळ - जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. हंगामासाठी लागणारे खते व बियाणे बाजारात उपलब्ध झाली आहेत. ४० हजार क्विंटल बियाणे व ८५ हजार टन खते विक्रीसाठी आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र,ज्वारीच्या बियाण्याचा तुटवडा असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

जिल्ह्याच्या बहुतांश भागात कमी-अधिक स्वरूपात का होईना पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मशागतीची तसेच धूळवाफेवरील पेरणीच्या कामांना काही प्रमाणात प्रारंभ झाला आहे. पश्‍चिम भागाचा खरीप हंगाम प्रमुख असल्याने या परिसरात लवकर आणि जास्त क्षेत्रावर पेरणी होते. त्यासाठी उन्हाळी 

पावसाची गरज असते. मात्र, यंदा या भागात उन्हाळी पाऊस कमी झाल्याने मशागतीची कामे रखडली होती. आता पाऊस झाल्याने या कामांना गती येऊ लागली आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यांत पश्‍चिम भागाच्या तुलनेत पेरणीस उशिरा प्रारंभ होतो. मात्र, या तालुक्‍यात उन्हाळी तसेच मॉन्सूनपूर्व पाऊस दमदार झाल्याने या तालुक्‍यांतही वेळेत पेरणी होण्याची शक्‍यता आहे. 

खरीप हंगामासाठी ५० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ४० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यामध्ये सोयाबीन, भुईमूग, भात, ज्वारी आदी पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे. महाबीजचे ज्वारीचे सात व नऊ नंबरचे बियाणे उपलब्ध झाले नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

पेरणी व ऊस लागवडीसाठी लागणारे रासायनिक खत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. सध्या जिल्ह्यात ८५ हजार मेट्रिक टन रासायनिक खत बाजारपेठेत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

Web Title: kashil satara news 40000 quintal seed