काशीपीठ पुरस्कार वितरण सोहळा लवकरच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

श्रीक्षेत्र काशी, वाराणसीचे श्रीकाशीजगद्‌गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 10 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. याच कार्यक्रमात स्वाती साखरकर कराळे लिखित 'म्हणे मन्मथ शिवलिंग' या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.

सोलापूर : काशीपीठाचे 2018 या वर्षीचे पुरस्कार श्रीकाशीजगद्‌गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनानुसार सोमवारी डॉ. शे.दे.पसारकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. प्रत्येकी 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. 

श्रीक्षेत्र काशी, वाराणसीचे श्रीकाशीजगद्‌गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 10 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. याच कार्यक्रमात स्वाती साखरकर कराळे लिखित 'म्हणे मन्मथ शिवलिंग' या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. डॉ. चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार वक्‍तृत्व, क्रीडा, अध्यापन, सूत्रसंचालन क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या डॉ. अनिल काशिनाथ सर्जे यांना देण्यात येणार आहे. वे. वीरसंगय्या स्वामी आदर्श शिक्षक पुरस्कार लातुरचे डॉ. विनय अपसिंगकर त्यांच्या शैक्षणिक व प्रबंधलेखन कार्यासाठी देण्यात येणार आहे. वे. सदाशिव स्वामी प्रज्ञा पुरस्कार सोलापूर विद्यापीठात गणित विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनीस दिला जातो. यावर्षी आढीव (पंढरपूर) येथील सुनीता हरी नागटिळक यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वे. बंडय्या मठपती समाजसेवा पुरस्कार लातूरचे डॉ. विठ्ठल लहाने यांना त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार आहे. लहान मुलांच्या मदतीसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अमेरिकेचा "द स्माईल ट्रेन हिरो अवॉर्ड' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विठाबाई देवाप्पा पसारकर कृतज्ञता पुरस्कार ठाण्याच्या डॉ. उषा रामवाणी गायकवाड यांना त्यांच्या लेखनकार्याबद्दल प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. ष.ब्र. परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरुण बबनराव खोरे यांना देण्यात येणार आहे. 

यंदापासून काशीपीठातर्फे सिद्रामप्पा भोगडे नाट्यकर्मी पुरस्कार हा नवीन पुरस्कार देण्यात येणार आहे. भोगडे हे जुन्या काळातील नाट्यकलावंत 
होते. त्यांच्या स्मृत्यर्थ अरुण भोगडे यांनी काशीपीठास देणगी दिली आहे. यावर्षीचा हा पहिला पुरस्कार शोभा बोल्ली यांना त्यांच्या नाट्यसेवेबद्दल प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस शिवशरण कंबाळेमठ, सिद्धय्या स्वामी हिरेमठ, बाबूराव मैंदर्गीकर आदी उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Kashipith Award Distribution Function at solapur