संततधारेमुळे कास तलाव तुडुंब

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

सातारा - कास परिसरात पावसाने लावलेल्या जोरामुळे आज सकाळी कास तलाव तुडुंब भरून वाहू लागला. शहरात कालपासून पावसाने जोर लावला असला, तरी कास परिसरात आजअखेर ५८९ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामध्ये २५ जून रोजी चालू हंगामात उच्चांकी ११०.४० मिलिमीटर म्हणजे सुमारे साडेचार इंच पावसाची नोंद झाली. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कासमध्ये ९२.८० मिलिमीटर पाऊस पडला.

सातारा शहर व परिसरात पावसाने कालपासून जोर धरला असला, तरी पश्‍चिमेला कासमध्ये जूनमध्येच पावसाने तुरळक प्रमाणात हजेरी लावली होती. ढगाळ हवामानामुळे तलावातील पाण्याचे बाष्पिभवन थांबले होते. छोटे- मोठे ओहोळ सुरू झाले होते. त्यामुळे तलावातील पाणी पातळी हळूहळू वाढत होती. वनविभागाकडील नोंदीनुसार कासमध्ये २६ जून रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत ११०.४० मिलिमीटर इतक्‍या या हंगामातील उच्चांकी पावसाची नोंद झाली. काल दिवसभर तसेच रात्रीही पावसाचा जोर कायम होता. ९२.८० मिलिमीटर पाऊस झाला. 

यावर्षीच्या उन्हाळ्यात पाच फुटांपर्यंत तलावातील पाणी पातळी खालावली होती. मात्र, यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे सातारकरांना पाण्यासाठी पावसाची फारशी प्रतीक्षा करावी लागली नाही. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कास तलाव काठोकाठ भरला. तलावातील पाणी सांडव्यावरून वाहू लागल्याचे पालिकेचे पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी सांगितले. 

Web Title: Kass Lake full