कवठेमहांकाळ शहराचा पाणी प्रश्‍न गंभीर

गोरख चव्हाण
मंगळवार, 11 जुलै 2017

प्रादेशिक योजना बंद - पाणीपुरवठ्यासाठी नवीन योजना आवश्‍यक

कवठेमहांकाळ - वाढते नागरीकरण, उपनगरे आणि सातत्याने प्रादेशिक पाणीपुरवठ्यात पडणारा खंड त्यामुळे कवठेमहांकाळ शहरात चार ते पाच दिवसाआड नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यातच म्हैसाळ योजना बंद, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी  तळ गाठल्याने शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष, नगरसेवकांपुढे शहरातील पाणीप्रश्न आ आसून उभा आहे. पाण्याचा प्रश्‍न कायमचा निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. त्यात चालू वर्षी नगरपंचायतीची निवडणूक झाली. यामध्ये नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना शहरातील विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रामुख्याने शहरी व उपनगरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नामुळे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियांना तोंड द्यावे लागत आहे.

पाणीयोजनांसह परिसरात पाण्याचे कोणतेही स्रोत उपलब्ध नसल्याने नगरपंचायतीसमोर पाणीप्रश्नाचे आव्हान उभे ठकले आहे. ऐन पावसाळ्यातच पावसाने दडी मारल्याने पाणीप्रश्नात आणखी जास्तच भर पडली आहे. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा तसेच सर्व नगरसेवकांनी शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद झाल्यानंतर झुरेवाडी येथून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र म्हैसाळ योजनाच बंद झाल्यामुळे त्याच विहिरीचे पाणी कमी झाले आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्याची तयारी नगरपंचायतीने केली आहे. शहरात वाढत निघालेली उपनगरे, नागरीकरण यामुळे ठोस योजना निर्माण करण्याची गरज आहे.

पाणी योजना बंद..
शहराला पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सध्या वीजबिलाअभावी बंद आहे. या योजनेवर तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्‍यातील अकरा गावांचा समावेश आहे. तासगाव तालुक्‍यातील योजनेचे वीजबिल रखडल्याने याचा परिणाम शहराला भोगावा लागत आहे. एकीकडे शहरातील प्रभागात पाच ते सहा दिवसाआड नागरिकांना पाणी मिळत आहे.

Web Title: kavthemahankal news water issue