केडगाव हत्याकांड; दिलीप सातपुतेसह 15 जण पोलिस ठाण्यात हजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नगर (पुणे) : केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या तोडफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह पंधरा जण आज कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले.

नगरसेवक विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक दीपक खैरे, हर्षवर्धन कोतकर, रमेश परतनी, सुनील सातपुते, देविदास मोढवे, मुकेश जोशी, विजय पठारे, संतोष फसले, चेमन शर्मा, विशाल गायकवाड, शुभम बेंद्रे, अनिल लालबोंद्रे, लंकेश हरबा यांचा समावेश आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर संतप्त जमावाने तोडफोड केली. याप्रकरणी सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार अनिल राठोडसह 600  जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. अटक आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी अनिल राठोड अद्याप पसार आहेत.

Web Title: kedgao murder case dilip satpute and 15 people in police station