मुख्य सूत्रधार विशाल कोतकरला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार नगरसेवक विशाल कोतकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने आज पहाटे कामरगाव शिवारात अटक केली. कोतकर आणि रवींद्र खोल्लम यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

केडगाव येथे सात एप्रिल रोजी महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी संदीप गुंजाळ, आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, बी. एम. ऊर्फ भानुदास कोतकर, बाबासाहेब केदार, संदीप गिऱ्हे, महावीर मोकळ, रवी खोल्लम यांना अटक केली. विशाल कोतकर याच्या सांगण्यावरून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना विशाल कोतकर हवा होता.

रवींद्र खोल्लम आणि विशाल कोतकर यांना प्रथमवर्ग न्यायाधीश एस. एस. पाटील यांच्यासमोर हजर केले. आरोपीला सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी निरीक्षक दिलीप पवार यांनी न्यायालयाकडे केली होती.

"ईडीआर'साठी आरोपीतर्फे अर्ज
ऍड. महेश तवले यांनी आरोपींतर्फे न्यायालयाकडे अर्ज करून मोबाईल फोनचे "ईडीआर' काढावेत, अशी मागणी केली. त्या "ईडीआर'मध्ये सर्व संभाषण पुढे येईल. त्याला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, असे अर्जामध्ये म्हटले आहे. हा अर्ज न्यायालयाने दाखल करून घेतला आहे. त्यावर पोलिसांचे म्हणणे मागविले होते.

Web Title: kedgaon double murder case vishal kotkar arrested crime