कोतकरच्या जामिनावर 22 जूनला सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी भानुदास कोतकर याच्या जामीन अर्जावर येत्या 22 जून रोजी सुनावणी होणार आहे. आरोपीतर्फे म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने ही मुदतवाढ देण्यात आली.

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी भानुदास कोतकर याच्या जामीन अर्जावर येत्या 22 जून रोजी सुनावणी होणार आहे. आरोपीतर्फे म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने ही मुदतवाढ देण्यात आली.

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी 30 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातील 10 आरोपींना अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी कोतकर याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यावर न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे मागितले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक अरुणकुमार सपकाळे यांनी न्यायालयात म्हणणे सादर केले. त्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र आरोपीतर्फे ऍड. महेश तवले यांनी न्यायालयात अर्ज देऊन आरोपीची काही वैद्यकीय कागदपत्रे मिळवायची असल्याने सुनावणीस मुदतवाढ देण्याची विनंती केली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. इनामदार यांनी त्यांचा अर्ज मंजूर केला.

Web Title: kedgaon murder case bhanudas kotkar bell result