केडगाव हत्याकांडानंतर शांततेचा भंग करणाऱ्या सहाशे जणांविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नगर -  केडगाव येथे शिवसेनेचा उपशहर प्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची शनिवारी (ता. 7) हत्या झाल्यानंतर दगडफेक, "रास्ता रोको', पोलिस वाहनांची मोडतोड केल्याच्या आरोपांवरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सहाशे जणांविरुद्ध आज रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण हंडाळ यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. 

केडगाव येथील दुहेरी हत्याकांड घडल्यानंतर शनिवारी शिवसेना कार्यकर्ते व जमावाने पोलिस वाहनांवर दगडफेक केली होती. वाहनांची मोडतोड करून नुकसान केले. तसेच, त्याच रात्री नगर-पुणे रस्त्यावर "रास्ता रोको' करून शांततेचा भंग केला आणि सरकारी कामात अडथळा आणला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सहाशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत 67 जणांचा थेट नामोल्लेख करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मनोज राठोड तपास करीत आहे.

Web Title: kedgaon murder case Crime against six hundred people violating peace