संदीप गुंजाळच्या ‘नार्को’साठी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याच्या ‘नार्को’ (न्यायवैद्यकीय) चाचणीसाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजली.

महापालिका प्रभाग क्रमांक ३२च्या पोटनिवडणुकीनंतर केडगावातील सुवर्णानगरमध्ये शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची हत्या झाली होती. याबाबत कोतवाली पोलिसांनी ३० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्यांपैकी आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, बी. एम. ऊर्फ भानुदास कोतकर, मुख्य आरोपी संदीप गुंजाळ, बाबासाहेब केदार, संदीप गिऱ्हे, महावीर मोकळ, रवी खोल्लम यांना पोलिसांनी अटक केली. 

संदीप गिऱ्हे, महावीर मोकळ, रवी खोल्लम हे सध्या पोलिस कोठडीत, तर अन्य आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. नगरसेवक विशाल कोतकर याच्या सांगण्यावरून हे हत्याकांड झाल्याचे तपासात समोर आले. पोलिस पथक विशाल कोतकरच्या शोधात आहे; पण अजून पोलिसांना धागेदोरे मिळालेले नाहीत. संजय कोतकर यांनी फोनवर मारण्याची धमकी दिल्याने संदीप व अन्य लोकांना विशाल कोतकर याने माझ्या संरक्षणासाठी पाठविले होते, असे खोल्लमने सांगितले. संजय कोतकर यांना गुंजाळ याने, तर ठुबे यांना गिऱ्हेने मारल्याचा जबाब गुंजाळने दिला आहे. 

Web Title: kedgaon murder case crime narko test sandeep gunjal