Wari2019 : केदनूर-पंढरपूर दिंडी

सतीश जाधव
रविवार, 30 जून 2019

बेळगाव - ऊन, पावसाची तमा न बाळगता केदनुरातील (ता. बेळगाव) श्री ज्ञानेश्वर सांप्रदायिक भजनी मंडळातर्फे विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही केदनूर-पंढरपूर दिंडीचे आयोजन केले आहे. दिंडीचे यंदाचे १३ वे वर्ष असून दिंडीत १५० वारकरी आणि भाविक सहभागी होतात.

बेळगाव - ऊन, पावसाची तमा न बाळगता केदनुरातील (ता. बेळगाव) श्री ज्ञानेश्वर सांप्रदायिक भजनी मंडळातर्फे विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही केदनूर-पंढरपूर दिंडीचे आयोजन केले आहे. दिंडीचे यंदाचे १३ वे वर्ष असून दिंडीत १५० वारकरी आणि भाविक सहभागी होतात.

आज गावात प्रदक्षिणा घालून दिंडी प्रस्थान झाली. मारुती वर्गे हे दिंडीचे चालक असून मंडळाचे अध्यक्ष शिवाजी संभाजी, उपाध्यक्ष भैरू बेळगावकर, अशोक चिंधी, सुनील लाड, आप्पय्या संभाजी, शिवरुद्र कोरे, मारुती गुडगेनट्टी व आप्पाजी मेणसे आदींनी दिंडींची परंपरा अखंडपणे जपली आहे.

दिंडीत सुरुवातीला ७० वारकरी सहभागी होत असत. आता १५० वारकरी व भाविक सहभागी होत असून महिलांचा सहभागही लाक्षणीय आहे. हरीनामामाचा जप करत दिंडी पुढे पुढे मार्गस्थ होते. ही दिंडी केदनूर, कडोली, भुतरामट्टी, गोटूर, चिक्‍कोडी, अंकली, निपाणी, कागवाड, म्हैशाळ, कमलापूर, सिताराम महाराज मठ खर्डी आदी मार्गे पंढरपूरला पोहचणार आहे. १२ रोजी आशाढी एकादशी असून १३ जुलै रोजी महाप्रसादाने दिंडीची सांगता होणार आहे.

दिंडीतील लोकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढतच आहे. केदनूर ते पंढरपूर हा प्रवास अगदी नियोजनबद्धरित्या पूर्ण केला जातो. २० वर्षाच्या युवकांबरोबर ते ७० वर्षाच्या वृद्ध वारकरी व भाविकाचा दिंडीत सहभाग असतो. 

पावसाळ्याला जोरदार सुरुवात झाली असल्यामुळे दिंडीतील वारकरी व भाविकांना रेनकोट किंवा प्लास्टिक कागद तसेच औषध गोळ्या, टाळ आदी साहित्य घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. दिंडीच्या वाटेत सामाजिक संदेशही दिले जातात. 

दिंडीचे यंदाचे १३ वे वर्ष असून, सुरवातीला ७० वारकरी होते. आता दिंडीकडे येणाऱ्यांचा कल वाढला असून, १५० पुरुष व महिला वारकरी दिंडीत सहभागी होतात. दिंडीच्या मार्गावर भजन, कीर्तन, आरती असे धार्मिक कार्यक्रम केले जातात.
-शिवाजी संभाजी,
अध्यक्ष, 
श्री ज्ञानेश्वर सांप्रदायिक भजनी मंडळ, केदनूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kednur - Pandharpur Wari special story