भाजपधार्जिण्या आयुक्तांना निवडणूकीपासून दूरच ठेवा - हारुण शिकलगार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

सांगली - आधी विकासकामांची अडवणूक करणारे आणि आता आचारसंहितेचा-निवडणूक आयोगाचा बागुलबुवा उभा करणाऱ्या आयुक्त रवींद्र खेबुडकर यांचा भाजपधार्जिणेपणा सतत उघड झाला आहे. त्यामुळे आता त्यांना महापालिका निवडणूक प्रक्रियेपासून बाजूलाच ठेवा अशी मागणी महापौर हारुण शिकलगार यांनी केली आहे. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला याबाबत निवेदन दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, आयुक्तांनी गेल्या वर्षभर विकास कामांच्या फायलींची सतत अडवणूकच केली आहे. आता 1969 चा आदेश दाखवत त्यांनी निवडणुकीपुर्वी तीन महिने आधी विकास कामांना मंजुरी देता येत नाही असा पवित्रा घेतला आहे. मात्र दुसरीकडे आमदार-खासदार निधीतून कामे न करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र कोणतेही आदेश नाहीत. पलूस कडेगाव पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी सांगत असताना त्यांनी मात्र लेखी आदेशाची मागणी केली. पदाधिकाऱ्यांची वाहने-मोबाईल काढून घेतले. त्यांचे कार्यालयातील नामफलकही काढून ठेवले. तक्रार केल्यनंतर त्यांनी वाहने देऊ केली. कारण काल निवडणूक आयोगाचे अधिकारी येणार होते. ही सर्व पार्श्‍वभूमी पाहता त्यांच्याकडून महापालिका निवडणूकीत पक्षपातीपणाच व्हायची शक्‍यता आहे. हीच भावना सर्व सत्ताधारी नगरसेवकांची असून निःपक्ष-निर्धोक निवडणुकांसाठी त्यांना आगामी निवडणुकांपासून दूर ठेवावे.

Web Title: Keep BJP MLAs away from the elections - Harun Shikhalgar