मधुमेहावर लक्ष ठेवा, वेळीच पळवून लावा...!

मधुमेहावर लक्ष ठेवा, वेळीच पळवून लावा...!

कोल्हापूर - मधुमेह हा एक मोठा आणि वाढता ताण. गेल्या वर्षात देशभरातील मधुमेही रुग्णांची संख्या होती सहा कोटी नव्वद हजारांवर. आणखी २५ वर्षांनी ही संख्या दहा कोटींपर्यंत पोचण्याची शक्‍यता आहे. मधुमेही रुग्णांबाबत अनेक सर्वेक्षणं झाली. विविध संशोधनं पुढं येत आहेत. 
जागतिक मधुमेह दिन साजरा करत असतानाही आता ‘आईज्‌ ऑन डायबेटिस’ असाच संदेश जगभर दिला जाणार आहे. 

दिवसेंदिवस मधुमेही रुग्णांची वाढती संख्या आणि त्याच्या दुष्परिणामांचा विचार करता आता प्रतिबंधात्मक उपायांवरच अधिक भर देणे महत्त्वाचे ठरणार असून मधुमेहाला कवटाळण्यापेक्षा त्यावर वेळीच मात करणाऱ्या अनेकांपैकी येथील परशुराम देसाई हे एक. येथील दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये शिपाई म्हणून ते कार्यरत आहेत. वाढत्या वयाबरोबर श्री. देसाई यांनी जाणीवपूर्वक प्रत्येक वर्षी काही वैद्यकीय तपासण्या करून घेण्याचे नियोजन केले. तीन-चार वर्षांपूर्वी एकदम शुगर वाढल्याचे लक्षात येताच त्यांना थोडासा धक्का बसला. पण वेळीच सावरत दररोज जांभूळ आणि सीताफळाच्या पानांच्या रसाचे सेवन सुरू केले आणि त्याच वेळी दररोज सायकलिंगवर अधिक भर दिला. दररोज रात्री जेवणानंतर किमान अर्धा तास चालण्यावरही त्यांनी भर दिला. शुगरचे प्रमाण नियंत्रणात आले.

मग त्यांनी फक्त सायकलिंग आणि रात्रीचे चालणे या दोन गोष्टीच सातत्याने पुढे सुरू ठेवल्या आणि आज शुगर नियंत्रणात ठेवण्यात ते यशस्वी झाले. ते सांगतात, ‘‘सतत आनंदी असणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मी ज्या ठिकाणी काम करतो, ते कॉलेजच मुळात नवनिर्मितीची प्रयोगशाळा आहे. येथे कला शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या तरुण मुलांशी माझे मैत्रीचे नाते आहे. त्यांच्या कॅनव्हासवर सुरू असणाऱ्या रंगांच्या मुक्त उधळणीचा मीही साक्षीदार असतो. त्यामुळे मन कसे सतत टवटवीत राहते.’’
श्री. देसाई एक प्रातिनिधिक उदाहरण. मात्र ‘मधुमेहावर लक्ष ठेवा - त्याला वेळीच पळवून लावा’ हा त्यांचा संदेश सर्वांसाठीच महत्त्वाचा ठरणार आहे. 

दोनपैकी एकाचे निदान
दोनपैकी एका मधुमेही रुग्णाचे निदान होत नाही. अनेक लोक दीर्घकाळ मधुमेहासह जगतात आणि त्यांना त्याची जाणीवही नसते. निदान होईपर्यंत, मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत दिसून येऊ शकते. मधुमेहाची सुरवात असणाऱ्यांपैकी सुमारे ७० टक्के प्रमाण निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून कमी करता येते, असे प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. राजेश देशमाने सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com