केसर आंबा यंदा खाणार भाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

रोपळे बुद्रुक (जि. सोलापूर) - नुकतीच झालेली गारपीट व वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरलेला केसर आंबा यंदा जास्तच भाव खाणार आहे. राज्याच्या विविध भागांत नुकतीच गारपीट झाली होती. त्यातच वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये रायवळसह सर्वच प्रकारच्या आंब्यांची गळ झाली आहे. आंब्याची मोठ्या प्रमाणात गळ झाल्यामुळे यंदा आंब्याचे 25 टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे.
Web Title: kesar mango rate