खानापूर पंचायत समितीचा आदर्शवत कारभार  

दिलीप कोळी 
सोमवार, 24 एप्रिल 2017

विटा - जीपीएस सिस्टीम लावून टॅंकरने पाणी पुरवठा, सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज आणि पंचायत समिती आपल्या दारी... असे विविध उपक्रम राबवणाऱ्या खानापूर  पंचायत समितीने राज्यात पंचायत राज व्यवस्थेत नवा आदर्श निर्माण केला आहे. 

विटा - जीपीएस सिस्टीम लावून टॅंकरने पाणी पुरवठा, सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज आणि पंचायत समिती आपल्या दारी... असे विविध उपक्रम राबवणाऱ्या खानापूर  पंचायत समितीने राज्यात पंचायत राज व्यवस्थेत नवा आदर्श निर्माण केला आहे. 

गेल्या पाच वर्षांत शिपायांपासून ते अधिकारी, तत्कालीन सभापती वैशाली माळी, उपसभापती सुहास बाबर, गटविकास अधिकारी संतोष जोशी यांच्या एकजुटीच्या कामामुळे व तालुक्‍यात राबविलेले विविध उपक्रम, विविध विकासकामांमुळे खानापूर पंचायत समितीला यशवंत पंचायतराज अभियानात विभागात व राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. आदर्शवत असा पंचायत समितीचा कारभार सुरू आहे.

खानापूर या दुष्काळी तालुक्‍यातील पंचायत समिती आहे. तालुक्‍यातील लोकांना सतत दुष्काळी स्थितीला सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असते. लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून पंचायत समितीच्या माध्यमातून मागेल तेथे टॅंकर देण्यात आला. एवढे करून न थांबता लोकांना पाणी मिळते की नाही हे पाहण्यासाठी जीपीएस सिस्टीम बसवली. तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडून राज्यातील पहिला व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाजाचा पहिला प्रयोग यशस्वी केला. झेडपी शाळांचा दर्जा, मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण  विभागाचे अधिकारी, शिक्षकांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले. ७५ शाळांत संगणक सुविधा, ३२मध्ये एलसीडी प्रोजेक्‍टद्वारे अध्यापन सुरू आहे. तालुक्‍यातील १२ शाळा, ३४ अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. ३६ शाळा ‘अ’ श्रेणीमध्ये आहेत. ६९ शाळा ‘ब’ श्रेणीत आहेत. 

पंचायत समितीत बायोमॅट्रीक मशीन बसवले असून ते नियमित सुरूचा आदर्श आहे. झेडपी क्रीडा स्पर्धेत चॅंपियनशिप मिळवली. झिरो पेन्डन्सी, विकासकामांबाबत आढावा बैठका सुरू केल्या. ‘पंचायत समिती आपल्या दारी’ उपक्रम सुरू केला. तालुक्‍यात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पायलट प्रोजेक्‍ट राबवला. ६५ ग्रामपंचायती निर्मलग्राम झाल्या. वैयक्तिक शौचालय बांधकामात पंचायत समिती जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. याचमुळे पंचायत समितीला शासनाने राज्यात  प्रथम क्रमांकाने गौरवले.

Web Title: khanapur panchayat samiti