मोहोळ तालुक्यात शेतकरी पुन्हा खरीपाकडे...

राजकुमार शहा 
बुधवार, 4 जुलै 2018

मजुरांची अडचण वेळेवर नसणारी विज व पाणी या तीन अडचणींमुळे शेतकरी पुन्हा खरीपाकडे वळला आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यात खरीपाचा टक्का वाढला आहे.

मोहोळ - उजनी डावा कालवा भिमा व सिना नद्या आष्टी तलाव यामुळे मोहोळ तालुका बागायती झाला आहे. मात्र मजुरांची अडचण वेळेवर नसणारी विज व पाणी या तीन अडचणींमुळे शेतकरी पुन्हा खरीपाकडे वळला आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यात खरीपाचा टक्का वाढला आहे.

भिमा जकराया व लोकनेते या तीन साखर कारखान्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे तर द्राक्ष डाळींब बोर केळी या फळबागांचे क्षेत्र ही वाढले आहे. पुर्वी सिंचनाची साधने उपलब्ध नसल्याने शेतकरी उडीद, सोयाबीन, तुर, मटकी, हुलगा या खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करीत  होते मात्र सिंचनाची साधने उपलब्ध झाल्याने शेतापर्यत पाणी आले. परिणामी बागायत क्षेत्र वाढले. मात्र मजुरांची अडचण वेळेत उपलब्ध न होणारी विज या मुळे शेतकरी पुन्हा खरीपाकडे वळला आहे. 

तुर हे नगदी पिक असल्याने गेल्या वर्षी तुरीची मोठया प्रमाणात पेरणी झाली होती. तसेच सोयाबीन व उडीद पिकांची ही पेरणी मोठया प्रमाणात झाली होती. कमी मजुर लागत असल्याने हरभरा ही वाढला आहे. या पिकामुळे जमिनीला चांगल्या पैकी बेवुड होत असल्याने रासायनिक व गाव खताची उणीव भरुन निघते. सध्या ग्रामीण भागात मजुर नसल्याने बैलांची संख्याही अत्यंत कमी झाली आहे. गावागणिस दोन किंवा तीन बैलजोड्या आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर ने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे. आजपर्यंत मोहोळ तालुक्यात केवळ दहा टक्के पेरणी झाली आहे. मात्र उन्हाचा तडाखा वाढल्याने पेरणी केलेली पिके भंडारुन चालली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Kharif crops percentage increase in Mohol Taluka