आमीर खान यांची जाखणगावला भेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

खटाव - जाखणगाव (ता. खटाव) येथे अभिनेता व पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान, जितेंद्र जोशी यांनी भेट दिली. जाखणगावने जलसंधारणामध्ये केलेल्या कामांची माहिती घेतली. तसेच चिमुकल्यांशी संवाद साधून गावाचे वॉटर बजेट जाणून घेतले.

महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांत ज्या गावांनी स्वतःला वाहून घेतले आहे, त्या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन पाण्याची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी आमीर खान आला होता. या वेळी विद्यार्थ्यांनी जलसंधारणाची कामे होण्यापूर्वी पाण्यासाठी करावी लागणारी वणवण, त्यामुळे शाळा व अभ्यासावर कसा परिणाम होत होता, याबाबत माहिती घेतली. 

आमीर खान म्हणाला, ‘खरेतर मी इथं काही सांगायला आलो नाही, तर जाखणगावकरांकडून जलसंधारणाच्या कामात राबविलेले वेगवेगळे उपक्रमाविषयी माहिती घेणे व कामे पाहण्यास आलो आहे. आम्ही पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून फक्त तीन वर्षांपासून पाण्यावर काम करत आहोत. पण, हे गाव गेली कित्येक वर्षे पाण्यावर काम करत आहे. खरे तर पहिल्या वर्षी गावात पाणी फाउंडेशनचे ट्रेनिंग सेंटर सुरू केले होते. त्यामुळे जाखणगाव हे नेहमीच रोल मॉडेल राहील. गावाने जिल्ह्यातील कितीतरी गावांना जलसंधारणासाठी उद्युक्त केले आहे. यापुढेही जाखणगावकरांनी इतर गावांना या कामासाठी मार्गदर्शन करत राहावे. जेणेकरून खटाव, माण तालुके दुष्काळमुक्त होतील.’’’

अभिनेता जितेंद्र जोशी म्हणाला, ‘‘जाखणगावने जलसंधारणाची कामे करून गावात पाणी आल्याने सुबत्ता आली आहे. गाव स्वयंपूर्ण बनले आहे. तथापि, आता एवढ्यावर न थांबता आपल्या जवळपासच्या ज्या गावात जलसंधारणाची कामे सुरू असतील तिथं दर रविवारी आपल्या आईबाबांकडे त्या गावात श्रमदान करण्यासाठी हट्ट करा.’’

प्रारंभी न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘पाणी हरवलं’ हे प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करून नागरिकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडले. पुसेगावच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य संजय कांबळे यांच्या ‘जलसंधारण व आधुनिक शेती’ या पुस्तकाचे प्रकाशन आमीर खान यांच्या हस्ते झाले. उपसरपंच जितेंद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक मिलिंद काटकर यांनी आभार मानले.

Web Title: khatav satara news aamir khan visit to jakhangav village