Video : किल्ले बनविण्यात बाल मावळे झाले दंग!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

विटा, माती, धान्याची पोती यापासून वेगळ्या प्रकारचे किल्ले हे लहान मावळे तयार करतात. तोरणा गड, प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग, नवदुर्ग या किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याची क्रेज मुलांमध्ये दिसून येते.

कोल्हापूर : परीक्षा संपून दिवाळीच्या सुटट्या लागल्यामुळे सध्या बालचमूंचे हात किल्ले तयार करण्यात व्यस्त झाले आहेत. कोल्हापूर शहरातील गल्ल्या मुलांच्या कलाकृतींतून उतरलेल्या आकर्षक किल्ल्यांमुळे सजल्या आहेत.

- ग्रामस्थाच्या एका फोननंतर, राष्ट्रवादीच्या खासदाराने 24 तासांत बुजवून दिले खड्डे

दिवाळी सुट्टी म्हटलं की नवीन खरेदी, दिवाळी फराळ, फटाक्यांची आतषबाजी याचबरोबर मातीचा तयार किल्ला करणे, यामध्ये बालचमू रंगून जात असतात. सध्या कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी लहान मुले किल्ले तयार करण्यात मग्न आहेत. विटा, माती, धान्याची पोती यापासून वेगळ्या प्रकारचे किल्ले हे लहान मावळे तयार करतात. तोरणा गड, प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग, नवदुर्ग या किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याची क्रेज मुलांमध्ये दिसून येते. बाजारात यावर्षी खूप आकर्षक आणि रंगीबेरंगी तयार मूर्ती आणि तयार किल्ले विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मात्र, तयार किल्ल्यांपेक्षा, स्वतःच्या हाताने किल्ला तयार करण्यास बालचमुंची पसंती आहे. 

- Video : मातीपासून बनवलेल्या कंदील, पणत्यांना कोल्हापूरकरांची पसंती!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम, आदर आणि भक्तिपोटी कोल्हापुरातील अनेक छोटे मावळे शूरवीर बनण्याची तयारी लहानपणापासूनच करत असतात. कोणतेही प्रशिक्षण नाही, तरीदेखील एखाद्या अभियंत्यासारखे ही मुले काम करीत असतात. कच्च्या मालापासून किल्ला तयार करण्यासाठी ही मंडळी सज्ज असतात. सगळ्यात देखणा किल्ला आपलाच असावा यासाठी ही बच्चे कंपनी मेहनत घेत आहेत. ऊन-पाऊस याची तमा न बाळगता सकाळी उठलं की किल्ल्याच्या मागेच. किल्ला तयार झाला की त्यावर महाराजांची मूर्ती, मावळे, मंदिर कमान, घोडा, वाघ याची आकर्षक मांडणी करून हे सवंगडी दिवाळीची सुट्टी आनंदात साजरी करत आहेत.

- साताऱ्याला मिळणार तीन खासदार व नऊ आमदार!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या प्रेम आणि आदरामुळे आम्ही सुट्टी लागल्यावर किल्ला बनवायला चालू करतो. सगळे एकत्र मिळून किल्ला बनवत असल्यामुळे खूप मजा येते.
- प्रदीप कुंभार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kids started to build small forts in Diwali holidays at kolhapur