किल्लेमच्छिंद्रगडमध्ये डॉक्‍टरांची सुन बाधित 

KIL20A00074.jpg
KIL20A00074.jpg

किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा,सांगली) : येथील शिवनगर व्यापारी वसाहतीत असलेल्या डॉक्‍टरांच्या सुनेचा कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आल्याने तिला उपचारासाठी कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 


व्यवसायाने डॉक्‍टर असलेल्या सदर महिलेच्या पतीचा अहवाल मात्र कोरोना निगेटीव्ह आला आहे. पती पत्नी वैद्यकिय व्यवसायानिमित्त राहण्यास कऱ्हाड (जि. सातारा) येथे असतात. उर्वरीत कुटुंबिय किल्लेमच्छिंद्रगड येथील व्यापारी वसाहतीत राहत असलेने कुटुंबातील व्यक्तींना पुढील तपासणीसाठी इस्लामपूर येथील शासकिय रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांचे तपासणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शिवनगर व्यापारी वसाहत कराड आणि वाळवा तालुक्‍याच्या सरहद्दीवर येत असलेने किल्लेमच्छिंद्रगड ग्रामपंचायत पदोधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी सतर्क झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून संबंधित कुटुबियांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करणेत आले आहे. 
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com